ETV Bharat / entertainment

SPKK MOVIE : प्रेक्षकांनी ट्विटरवर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला म्हटले ब्लॉकबस्टर - ब्लॉकबस्टर चित्रपट

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' आज, 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट फार जास्त आवडत आहे. या चित्रपटाचे रिव्ह्यू प्रेक्षक ट्विटरवर देत आहे.

Satyaprem ki katha movie
सत्यप्रेम की कथा चित्रपट
author img

By

Published : Jun 29, 2023, 1:23 PM IST

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' २९ जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फार जास्त आवडत आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आणि कियारा यांच्या जोडीला पुन्हा एकदा भरभरून प्रेम मिळत आहे. याआधी ही जोडी भूल भुलैया 2 या चित्रपटात दिसली होती आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. आता ज्या प्रेक्षकांनी चित्रपटाचा पहिला शो पाहिला आहे ते या चित्रपटाचे रिव्ह्यू ट्विटरवर देत आहेत. बहुतेक प्रेक्षक 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट हिट असल्याचे सांगत आहेत.

प्रेक्षकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटले : चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि अजूनही चित्रपटावर रिव्ह्यू येत आहेत. कार्तिक-कियाराच्या भूल भुलैया २ नंतर हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला आहे. दरम्यान, एका प्रेक्षकांनी ट्विटरवर लिहिले आहे की, एक सुंदर प्रेमकथा ज्याचे हृदय योग्य ठिकाणी आहे, जबरदस्त.. धमाकेदार.. कार्तिक-कियारा रॉक्स. तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने लिहिले आहे की, या चित्रपटात मनोरंजन, प्रेम आणि भावना सर्व काही आहे, बाप-मुलावर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटातील काही दृश्ये हृदय पिळवून टाकणारी आहे, कार्तिकने उत्तम अभिनय केला आहे. अशा अनेक प्रतिक्रिया या चित्रपटाबाबत ट्विटरवर येत आहे. अभिनेता सुनील शेट्टीने काल रात्री ट्विट करत लिहले, सत्यप्रेम चित्रपटाच्या कथेबद्दल मी सर्व काही बरोबर ऐकत आहे, आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी साजिद भाईचे अभिनंदन.

पहिल्या दिवशी चित्रपट किती कमाई करू शकतो? : चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षकांकडून ट्विटरवर स्पष्टपणे सांगितल्या जात आहे की पहिल्या दिवशी चित्रपट 10 कोटींहून अधिक कमाई करेल. दरम्यान, चित्रपटाच्या ओपनिंग डेची कमाई 7 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर आता रविवारपर्यंत हा चित्रपट 40 ते 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय करेल असे बोलले जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Leo Movie : 'लिओ' चित्रपटातील विजयचे 'ना रेड्डी' गाणे वादात अडकले
  2. SPKK Movie : 'सत्यप्रेम की कथा' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित, 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडू शकेल ?
  3. Afalathoon release date : आंधळा, मुका आणि बहिऱ्या मित्रांची अतरंगी धमाल चित्रपट ‘अफलातून’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.