ETV Bharat / entertainment

Satyaprem Ki Katha box office collection: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने १३व्या दिवशी केली 'इतकी' कमाई... - कियारा अडवाणी

जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर, समीर विद्वांस दिग्दर्शित रोमँटिक चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने १३व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. १३ व्य दिवसानंतर या चित्रपटाने एकूण किती कमाई केली यावर एक नजर टाकूयात.

Satyaprem Ki Katha
सत्यप्रेम की कथा
author img

By

Published : Jul 12, 2023, 12:23 PM IST

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने जगभरात १०० कोटीचा आकडा १२व्या दिवशी पार केला, असे निर्माते समीर विद्वांस यांनी मंगळवारी सांगितले. दुसऱ्या वीकेंडमध्ये जोरदार कमाई केल्यानंतर या चित्रपटाने सोमवारी मोठी घसरण पाहिली. दरम्यान आता १३ व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने १३व्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे. इंडस्ट्री ट्रॅकरच्या मते, 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने १३ व्या दिवशी देशांर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे २.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने १२ व्या दिवशी पेक्षा थोडी जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. १२ व्या दिवशी या चित्रपटाने २ कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय हिंदी मार्केटमध्ये एकूण व्याप १०.५५ % इतका होता.

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने १३ व्या दिवशी देशांर्गत ७०.१६ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन गाठले आहे. या चित्रपटाला आतापर्यंत, कमीत कमी स्पर्धेचा सामना करावा लागला आहे. मात्र आता कार्तिक आणि कियाराच्या चित्रपटाला टॉम क्रूझच्या बहुप्रतिक्षित मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ सोबत सामना करवा लागणार आहे. हा चित्रपट आज भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आणि कियाराचा यापूर्वीचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया २'ने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली होती. त्यानंतर आता 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे.

साजिद नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमाह पिक्चर्स द्वारे संयुक्तपणे निर्मित, ६० कोटी रुपयांच्या अंदाजित बजेटसह, 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने निर्मितीमध्ये लागलेले पैसे काढले आहेत. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट आता काही दिवस बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकतो. सध्या देशांर्गत या चित्रपटाची कमाई १०० कोटीपर्यत गेली नाही आहे. त्यामुळे काही दिवसात हा चित्रपट देशांर्गत १०० कोटीच्या कल्बमध्ये प्रवेश करेल असे दिसत आहे. तसेच आता करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलैपासून बॉक्स ऑफिसवर येणार आहे. त्यानंतर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला कमाईमध्ये घसरण पाहावी लागू शकते. 'सत्यप्रेम की कथा, या खडतर स्पर्धेवर कशी मात करेल हे बघणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt treats fans with BTS footage : आलिया भट्टने मातृत्व स्वीकारल्यानंतर 'हे' गाणे केले होते शूट....
  2. SS Rajamouli temple visits : परदेशात राहून कंटाळलेल्या राजामौलींनी केले तामिळनाडूत अध्यात्मिक पर्यटन
  3. Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीला म्हटले सर्वात मौल्यवान खजिना...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.