मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने रिलीजच्या 11व्या दिवशी 9 जुलै रोजी चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाने गेल्या रविवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 11व्या दिवशी जबरदस्त कामगिरी केल्यानंतर चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 66 कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या 12व्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट समोर आला आहे.
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे एकूण कलेक्शन : या शुक्रवारी चित्रपटाने 2.50 कोटींच्या कलेक्शनसह दुसऱ्या वीकेंडला सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी 4.50 कोटी आणि रविवारी 5 कोटींहून अधिक कमाई केली. दरम्यान आता कलेक्शनच्या रिपोर्टनुसार, सोमवारी सुमारे 2.50 कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला आहे. तसेच आता या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 68 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. 'सत्यप्रेम की कथा'ने या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींचा टप्पा पार केला होता. दरम्यान, 9 जुलै रोजी म्हणजेच रिलीजच्या 11 व्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. आता सध्या निर्मात्यांना दुसऱ्या वीकेंडपासून चांगल्या कलेक्शन होण्याची अपेक्षा आहे.
कार्तिक आर्यनने मानले प्रेक्षकांचे आभार : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने 11व्या दिवशी आपले पैसे वसूल केले आहेत. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटाने 11 दिवसात एकूण 66.06 कोटींची कमाई केली आहे. या शानदार यशानंतर कार्तिक आर्यनने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट एक पोस्ट करून सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे अनेक गाणे हिट झाले आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियाराने फार चांगला अभिनय केला आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहयला जात आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानंतर 'ओ माय गॉड 2' आणि 'गदर 2' हे चित्रपट रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे त्यानंतर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर व्यवसाय करायला कठीण जाणार त्यामुळे या 10 दिवसात या चित्रपटाने 100 कोटीचा आकडा पार केला तर हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये दाखल होईल.
हेही वाचा :