ETV Bharat / entertainment

Aashiqui 3 : एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत आशिकी 3 मध्ये काम करण्यास सारा अली खान उत्सुक - आशिकी फ्रँचायझीची चाहत्यांना भुरळ

सारा अली खानने एका मुलाखतीत दावा केला होता की आशिकी 3 साठी तिच्याशी संपर्क साधला गेला नसला तरी निर्मात्यांनी विचारल्यास ती चित्रपट करायला तयार आहे. 2020 मध्ये लव्ह आज कलच्या चित्रीकरणादरम्यान सारा अली खान आणि कार्तिक आर्यन डेट करत असल्याची अफवा पसरली होती. सध्या आशिकी 3 च्या निर्मितीची तयारी सुरू असून यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.

सारा अली खान
सारा अली खान
author img

By

Published : Apr 1, 2023, 4:49 PM IST

मुंबई - आशिकी फ्रँचायझीला तिसरा चित्रपट मिळत आहे, ज्याचे दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहे आणि अभिनेता कार्तिक आर्यन याचे नेतृत्व करणार आहे. या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीची निवड होणे बाकी असताना, सारा अली खानने चित्रपटात दिसण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2020 मध्ये लव्ह आज कल चित्रपटाच्यावेळी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन डेट करत असल्याची अफवा पसरली होती. तथापि, चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच हे जोडपे वेगळे झाले.

आशिकी 3 साठी सारा अली खान उत्सुक - साराने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की आशिकी 3 साठी विचारले गेले नसले तरीही निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला तर ती चित्रपटात काम करेल. सूत्रांनी दावा केला होता की सारा चित्रपटाच्या निर्मात्यांच्या संपर्कात होती. सारा अली खानने यापूर्वी रणवीर अल्लाबडियाला त्याच्या पॉडकास्ट द रणवीर शोसाठी 2020 मध्ये कार्तिकसोबतच्या तिच्या ब्रेकअपबद्दलचा खुलासा केला होता.

आशिकी फ्रँचायझीची चाहत्यांना भुरळ - रोमँटिक शैलीतील आशिकी फ्रँचायझी चाहत्यांना खूप आवडते. मूळ आशिकी, महेश भट्ट दिग्दर्शित, 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. फ्रँचायझीमधील दुसरा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. दोन्ही चित्रपटांना प्रचंड यश मिळाले आहे. मधुर संगीताने नटलेली प्रेम कथा असलेली आशिकीची गोष्ट लोकांना एक सुखद अनुभूती देते.

सारा अली खानचा वर्कफ्रेंट - सारा अली खानचा नवीन चित्रपट गॅसलाइट डिस्ने प्लस हॉटस्टारवर आला आहे. विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला अद्याप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. अभिनेत्री सारा अली खान अनुराग बसूच्या आगामी मेट्रो... इन दिनोमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेरसह पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा - Jab Ki Met Ka Again :अर्जुन कपूरने करीना कपूरसोबतचा फोटो शेअर केला, चाहत्यांनी केली सिक्वेलची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.