ETV Bharat / entertainment

Sara ali khan and Ananya panday: सारा अली खान आणि अनन्या पांडे 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये झळकणार - करण जौहर

Sara ali khan and Ananya panday: सारा अली खान आणि अनन्या पांडे 'कॉफी विथ करण 8'च्या तिसऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या एपिसोडमध्ये अनन्याबद्दल सारा एक महत्त्वाचा खुलासा करणार आहे, त्यामुळे अनेकजण या एपिसोडसाठी उत्सुक आहेत.

Sara ali khan and Ananya panday
सारा अली खान आणि अनन्या पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 1:01 PM IST

मुंबई - Sara ali khan and Ananya panday : 'कॉफी विथ करण 8' मध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघी मैत्रिणी दिसणार आहेत. 'मागील एपिसोडच्या तुलनेत यावेळी अधिक मस्ती करताना करण जोहर या शोमध्ये दिसेल. या एपिसोडसाठी सारा आणि अनन्याचे चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. सारानं 2018 मध्ये सीझन 6द्वारे 'कॉफी विथ करण'मध्ये पदार्पण केले होते. यावेळी ती वडील-अभिनेता सैफ अली खानसोबत चॅट शोमध्ये आली होती. यानंतर गेल्या वर्षी, 'कॉफी विथ करण सीझन 7'मध्ये, सारा अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत आली होती.

कॉफी विथ करण 8 : अनन्या 2019मध्ये 'कॉफी विथ करण सीझन 6' या शोमध्ये टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्यासोबत दिसली होती, त्यांचा 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपट रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी तिनं या शोमध्ये हजेरी लावली होती. 2019मध्ये अनन्यानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या वर्षी, अनन्या विजय देवरकोंडासोबत 'कॉफी विथ करण सीझन 7'च्या चौथ्या एपिसोडमध्ये दिसली होती. आता 8व्या सीझनमध्ये ती सारासोबत दिसेल.

प्रोमो केला रिलीज : करण जोहरनं एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यात, अजय देवगण, राणी मुखर्जी, सारा अली खान आणि अनन्या पांडे हे कलाकार दिसत आहेत. अनन्या पांडेबाबत सारा अली खाननं प्रोमोमध्ये म्हटलं, 'तिच्याकडे 'नाईट मॅनेजर' आहे'. या प्रोमोमध्ये सारानं अनन्या आणि आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जवळपास उघड केलं आहे. याशिवाय या प्रोमोमध्ये अनन्या स्वत:ला अनन्या कोय कपूर म्हटल्याचं देखील दिसत आहे.

वर्कफ्रंट : सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'मॅट्रो इन दिनो'मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय ती 'मर्डर मुबारक' , 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटामध्ये झळकेल. सारा शेवटी 'जरा हटके जरा बचके'मध्ये विकी कौशलसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटानं 61.02 कोटीची कमाई केली होती. दुसरीकडे अनन्या 'खो गये हम कहाँ' आणि ' कॉल मी बे' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शेवटी अनन्या आयुषमान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2'मध्ये दिसली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता.

हेही वाचा :

  1. Ira khan Pre Wedding Functions : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात
  2. Creation of a Sanskrit band : पुण्यात संस्कृत बँडची स्थापना, 'श्रीवल्ली'सह लोकप्रिय गाण्यांचं संस्कृतमधून सादरीकरण
  3. Uorfi Javed viral video : पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.