मुंबई : अभिनेता सैफ अली खान आज १६ ऑगस्ट रोजी त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त पतौडी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खान आणि इब्राहिम अली खान भेटवस्तू घेऊन त्याच्या घरी पोहोचले आहेत. सारा आणि इब्राहिमचा सैफच्या घरी पोहचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सारा भाऊ इब्राहिम अली खानसोबत सैफच्या इमारतीत वाढदिवसाठी फुगे घेऊन जाताना दिसत आहे. साराने पकडलेल्या फुग्यामध्ये एका फुग्यावर 'बेस्ट डॅड' असे लिहिले आहे.
सारा आणि इब्राहिम वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले : दरम्यान यावेळी साराने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. या देसी अवतारात ती खूप खास दिसत आहे. तर इब्राहिमने ग्रे रंगाचे टी-शर्टसह निळ्या रंगाचा जीन्स घातल आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने यावर सनग्लासेस लावले आहेत. या लूकमध्ये तो खूपच देखणा दिसत आहे. सारा आणि इब्राहिम ही सैफ आणि अमृता सिंग यांची मुले आहेत. सैफ आणि अमृता सिंगचे लग्न १९९१मध्ये झाले होते. याशिवाय या दोघांनी २००४मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अमृता सिंग ही आपल्या मुलांसह सैफपासून वेगळी राहते.
करीना कपूरने दिल्या सैफला शुभेच्छा : करिना कपूर खानने पती सैफसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनाने गुलाबी रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. याशिवाय फोटोमध्ये सैफ हा शर्टलेस दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत करिनाने लिहिले की, ' मी इंस्टाग्रामवर 'हा फोटो पोस्ट करू शकत नाही असे त्याला वाटले म्हणून, त्याने हा फोटो निवडला आहे. शेवटी त्याचा वाढदिवस आहे. तू असाच रहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जान. खरंच तुझ्यासारखा कोणीच नाही. तुझ्याबद्दल मी दिवसभर लिहू शकते, पण केकही खावा लागेल ना'. असे तिने पोस्टमध्ये लिहले आहे. सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ओम राऊतच्या 'आदिपुरुष'मध्ये दिसला होता. सध्या त्याच्याकडे 'देवरा' आणि 'गो गोवा गॉन'चा सीक्वल चित्रपट आहे.
हेही वाचा :