मुंबई : संतोष जुवेकर याने नाटक, मालिका, सिनेमा आणि वेब सिरीज या सर्व प्रांतांत मुशाफिरी केली आहे. त्याने पॉझीटिव्ह आणि निगेटिव्ह प्रकारच्या भूमिका तेवढ्याच ताकदीने साकारल्या आहेत. तो आता प्रथमच ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. त्याबद्दल त्याने समाज माध्यमांवर पोस्टसुद्धा टाकली आहे. आगामी ऐतिहासिक 'रावरंभा' या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. यात त्याने जालिंदर नावाचे खतरनाक पात्र रंगविले आहे. हा जालिंदर म्हणजे एक कपटी माणूस आहे. तो एक दलाल आहे, जनावरांची देवाण घेवाण करतो. परंतु या साध्या वाटणाऱ्या व्यवसायात तो फितुरी करतो. स्वार्थासाठी शत्रूला मदत करतो. अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच करीत असल्याचे तो सांगतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विविधांगी भूमिका : संतोष जुवेकर म्हणाला की, एक अभिनेता म्हणून निरनिराळ्या भूमिका करायला मिळाव्यात अशी नेहमीच इच्छा असते. प्रत्येक कलाकार विविधांगी भूमिका करण्यासाठी झटत असतो. मलाही प्रत्येक भूमिका निराळी असावी, ती निराळ्या पद्धतीने करावी असे वाटत असते. मी काही नकारात्मक भूमिका केल्या आहेत, परंतु रावरंभा मधील माझी भूमिका निगेटिव्ह जरी असली तरी ती वेगळ्या धाटणीची आहे. त्या पात्राला म्हणजे जालिंदरला त्याचे असे विचार आहेत. म्हणून तो शत्रूला मदत करण्यात गैर समजत नाही. सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. मी त्यातील एकाचा भाग बनू शकलो याबद्दल मी निर्माते आणि दिग्दर्शक यांचा ऋणी आहे. मला या प्रकारची भूमिका साकारताना खूप मजा आली. अर्थात याही भूमिकेला प्रेक्षक प्रेम देतील अशी मी आशा बाळगून आहे.
वासू पाटील यांनी केले कलादिग्दर्शन : ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. प्रताप गंगावणे आणि संजय जाधव यांनी छायाचित्रिकरणाची जबाबदारी सांभाळली आहे. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केले आहे. अमितराज यांनी त्यावर संगीतसाज चढविला आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे असून ऐतिहासिक चित्रपटांचा विशेष असणारी वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी केली आहे. प्रताप बोऱ्हाडे यांनी रंगभूषा डिपार्टमेंट सांभाळले असून कलादिग्दर्शन वासू पाटील यांनी केले आहे. 'रावरंभा' ची निर्मिती केली आहे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी आणि सहनिर्माते आहेत अजित भोसले आणि संजय जगदाळे. येत्या १२ मे ला हा चित्रपट महाराष्ट्रतील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.