मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अभिनयासोबतच त्याच्या साईड बिझनेससाठी ओळखले जाते. संजय दत्तप्रमाणे असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स तसेच अनेक साइड बिझनेस देखील आहेत. सध्याला संजय दत्त त्याच्या साईड बिझनेसमुळे प्रकाशझोतात आला आहे. संजय दत्तने एका दारू कंपनीत गुंतवणूक करून नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. त्याने अल्कोहोल आणि बेव्हरेज स्टार्टअप कार्टेल आणि ब्रदर्सशी हातमिळवणी केली आहे. या कंपनीच्या सहकार्याने संजय दत्तने 'द ग्लवॉक' नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे.
संजय दत्तने केली गुंतवणूक : विशेष म्हणजे, अल्कोहोल कंपनी 'द ग्लेनवॉक' भारतात आपल्या दारूच्या ब्रँडची निर्यात आणि किरकोळ विक्री करण्याचा विचार करत आहे. कंपनीने मॉर्गन बेव्हरेजेस कंपनीसह लिव्हिंग लिक्विड्सचे सैनी आणि ड्रिंक बार अकादमीचे जेएस मेरानी यांच्याशीही हा करार केला आहे. दरम्यान भारतात दारूचा बाजार वाढत असून संजय दत्तबद्दल असे बोलले जात आहे की, तो योग्य वेळी या व्यवसायात उतरला आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनच्या अहवालानुसार, 2022 मध्ये भारत स्कॉच व्हिस्की मार्केटच्या निर्यातीत फ्रान्सपेक्षा खूप पुढे गेला आहे. अहवालानुसार, भारतात या व्यवसायात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संजय दत्तचा वर्कफ्रंट : संजय दत्त आता अभिनेता म्हणून नाही तर खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत राज्य करत आहे. केजीएफ २ (KGF-2) या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात अधीरा नावाचा खलनायक बनून संजय दत्तने खलनायकांच्या दुनियेत एक मोठा ठसा उमटवला आहे. अशा परिस्थितीत संजय दत्त आता शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' आणि साऊथ सुपरस्टार विजयचा चित्रपट लिओमध्ये खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापुर्वी देखील त्याने बॉलिवूड चित्रपट अग्निपथमध्ये हृतिक रोशन विरोधात खलनायकाची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारली होती. या चित्रपटासाठी संजय दत्तचे फार कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार जास्त कमाई केली होती. हा चित्रपट 26 जानेवारी 2012 रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा :