ETV Bharat / entertainment

Sam Bahadur sonng release : 'सॅम बहादूर'मधील 'बढते चलो' या देशभक्तीपर गाण्याचं विकी कौशलनं केलं लॉन्चिंग - Badhte Chalo ahead of films release

Sam Bahadur sonng release : 'सॅम बहादूर' चित्रपटातील 'बढते चलो' हे देशभक्तीपर गाणं सोमवारी निर्मात्यांनी रिलीज केलं. गुलजार यांनी लिहिलेल्या या गीताला शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलंय. गाणे ऐकताना देशभक्तीची भावना जागृत होतेय.

Sam Bahadur sonng release
'सॅम बहादूर' चित्रपटातील 'बढते चलो' गाणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 4:32 PM IST

मुंबई - Sam Bahadur sonng release : 'सॅम बहादूर' या युद्धपटाची प्रतीक्षा विकी कौशलचे तमाम चाहते करताहेत. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली असताना निर्मात्यांनी बढते चलो हे देशभक्तीपर गीत रिलीज केले आहे. गीतकार गुलजार यांच्या लेखनीतून उतरेलं हे गीत शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्यातील दृष्ये आणि ह्रदयाला भिडणारा सूर यामुळे देशभक्तीची भावना निर्माण होते. गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशल, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रॅकची लिंक शेअर करत विकी कौशलनं इंस्टाग्रामवर लिहिले, "रुकना नही. झुकना नहीं. बढते चलो गाणे रिलीज झालंय." 'सॅम बहादूर' या चित्रपटात विकी भारताचा युद्ध नायक आणि पहिला फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

विकीनं अलिकडेच चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले होते. याध्ये तो अतिशय कडक शिस्त असलेल्या सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होत. यामध्ये त्याच्या तोंडी अनेक दमदार संवाद पाहायला मिळाले होते. यातील सर्वात शेवटी संवाद होता, "आज के बाद कोई भी अफसर या जवान..मेरे रिटन ऑर्डर के बिना अपनी पोस्ट से पिछे नहीं हाटेगा..और मैं वो ऑर्डर कभी नहीं दूंगा."

'सॅम बहादूर' चित्रपट हा भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची लष्करातील कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ मोठी आहे आणि पाच युद्धांचा त्यांना दांडगा अनुभव होता. फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि त्यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात विजयाचे नेतृत्व केले. या विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. अशा या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटात सॅम माणेकशॉंची भूमिका विकीनं अतिशय समरस होऊन साकारली आहे. यासाठी त्यांच्या व्यक्तीरेखेचा खूप बारकाईनं अभ्यास केल्याचं ट्रेलरवरुन दिसलं आहे.

हेही वाचा -

  1. Aryan Khan Turns 26 : 'बिग ब्रदर आणि बेस्ट फ्रेंड' म्हणत आर्यन खानला सुहानानं दिल्या वाढदिवसाच्या सदिच्छा

2. Big B Diwali Wishes : अमिताभ बच्चनची जलसामध्ये प्रार्थना, दिवाळी निमित्त दिल्या शुभेच्छा

3. Siddharth Kiara First Diwali : स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली रोमँटिक दिवाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.