ETV Bharat / entertainment

Kisi ka Bhai Kisi ki Jaan : किसी का भाई किसी की जानचे दररोज 16000 शो, बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कमाईची शक्यता - सलमान खान

किसी का भाई किसी की जान हा चित्रपट देशांतर्गत 4500 हून अधिक स्क्रीनवर आणि परदेशात 1200 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. रोज चित्रपटाचे सुमारे 16000 स्क्रिनिंग होतील. हा चित्रपट सलमान खानचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक वितरीत होणारा चित्रपट ठरत आहे.

किसी का भाई किसी की जान
किसी का भाई किसी की जान
author img

By

Published : Apr 21, 2023, 12:29 PM IST

मुंबई - 2019 मध्ये भारत चित्रपट रिलीज झाल्यापासून सलमान खानचा पहिल्यांदाच 'किसी का भाई किसी की जान' हाचित्रप ईदच्या पाश्वभूमीवर रिलीज होतोय. या चित्रपटात सलमान खानसह पूजा हेगडे, अभिनेता व्यंकटेश डग्गुबत्ती, नवोदित शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि जस्सी गिल आणि जगत्पती बाबू सारखे इतर कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाची आगाऊ बुकिंग सोमवारी सुरू झाली होती.

किसी काभई किसी की जानचे रोज 16000 शो - मेगा स्टारर चित्रपटाबद्दल मिळालेले सर्वात मोठे अपडेट म्हणजे ते देशांतर्गत 4500 हून अधिक स्क्रीनवर आणि परदेशात 1200 हून अधिक स्क्रीनवर दाखवले जाईल. दररोज चित्रपटाचे सुमारे 16000 स्क्रिनिंग होतील. भारतात 4500 हून अधिक स्क्रीन्स असलेल्या हिंदी चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात विस्तृत रिलीज आहे. व्यंकटेश दग्गूबातीसारखा साऊथ इंडियन स्टार चित्रपटत सहकलाकार असल्यामुळे याचा लाभ तेलुदु भाषिक दोन्ही राज्यांसह दक्षिण भारतात होऊ शकतो.

मोठ्या प्रमाणावर रिलीज होणाऱ्यामध्ये किसी की भाई किसी की जान - किसी का भाई किसी की जानसह सहाहून कमी हिंदी चित्रपटांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रिलीज मिळाले आहे. पठाण, ब्रह्मास्त्र, ठग्स ऑफ हिंदोस्तान, भारत आणि दबंग 3 हे इतर काही चित्रपट आहेत जे इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज झाल्यामुळे लगेचच ध्यानात येतात. आंतरराष्‍ट्रीय सर्किटमध्‍ये वितरणाला आळा बसला आहे कारण यापेक्षा जवळपास दुप्पट स्क्रीन असलेले इतर हिंदी चित्रपट आले आहेत.

लवकर दुसरे मोठे रिलीज नसल्याचा होणार चित्रपटाला फायदा - तिकिटांची पूर्व-विक्री पाहता, व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी चित्रपटाची आगाऊ आरक्षणे उत्तम असल्याचे सांगितले. 'मला कलेक्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे. दिवसभराची एकूण संख्या योग्य पातळीवर आणेल. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनसाठी 15 ते 18 कोटींची संभाव्य कमाई होऊ शकेल. पुढील पाच ते सहा आठवड्यांपर्यंत इतर कोणतेही मोठे रिलीज होणार नसल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकेल,' असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Twitter Blue Tick : इलॉन मस्क सदस्यत्व फी भरण्यास नकार देणाऱ्या 'या' स्टार्ससाठी ट्विटरने काढून टाकले ब्लू टिक्स...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.