मुंबई - Salman Khan Umaang २०२३ : मुंबई पोलिसांचा दरवर्षीप्रमाणे 'उमंग' हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, बॉबी देओल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. 'उमंग' कार्यक्रमातील स्टार्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एका व्हिडिओनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पापाराझीनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सलमान खानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाईजान ज्येष्ठ गायिका उषा उत्थुपला मिठी मारताना दिसत आहे.
सलमान खाननं मारली मिठी : उषा उत्थुप या व्हीलचेअरवर होत्या. मिठी मारताना सलमानच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळालं. नेव्ही ब्लू शर्ट, ग्रे पँट आणि ब्लेझरमध्ये सलमान खान नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता. सलमान खानच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिल, ''सलमान तू खरचं खूप चांगला व्यक्ती आहेस''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'हे भाईजानचं प्रेम आहे , जो तो सर्वांना देतो'. याशिवाय आणखी एकानं लिहिलं, ''सलमान मी तुझा खूप मोठा चाहता आहे'' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
स्टार्सचे लूक : या कार्यक्रमात 'किंग खान'नं काळ्या सूटवर पांढरा शर्ट घातलेला होता. याशिवाय त्यानं यावर काळ्या रंगाचा सनग्लास लावला होता. अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, ती निळ्या रंगाच्या बनारसी साडीत दिसली. या साडीवर तिनं सुंदर असा नेकलेस आणि इयररिंग्स घातली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केसं बनमध्ये बांधले होते. याशिवाय रवीना टंडन, रकूल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि वाणी कपूर यांसारखे कलाकारही या कार्यक्रमात दिसून आले.
हेही वाचा :