ETV Bharat / entertainment

Salman khan : सलमान खान पडद्यापुरतातरी आहे अत्यंत संस्कारी; जाणून घ्या काय म्हणाला भाईजान

author img

By

Published : Apr 11, 2023, 7:02 PM IST

सलमान खान हे नाव समोर आले की अनेक कॉंट्रोव्हर्सीजच्या बातम्या डोळ्यासमोर येतात. अर्थात हे इतर अनेक नायकांच्या बाबतीतही घडत असते. परंतु सलमान खान इतकी फॅन फॉलोईंग जवळपास कोणाचीच नाही.

Salman khan
सलमान पडद्यापुरतातरी आहे अत्यंत संस्कारी

नवी दिल्ली : सलमान खान जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखल झाला तेव्हा त्याने पहिल्या चित्रपटात नगण्य भूमिका केली होती. त्याचे वडील सलीम खान, ज्यांचे चित्रपटसृष्टीत खूप वजन होते. त्यांची मदत न घेता त्याला फिल्म इंडस्ट्रीत नाव कमवायचे होते. फिमेल सुपरस्टार रेखाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ मध्ये सलमानने तिच्या दिराची भूमिका साकारली होती. अत्यंत हँडसम आणि उत्तम अभिनयाची जाण असणाऱ्या सलमानला एका संधीची गरज होती. ती त्याला राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘मैने प्यार किया’ मधून मिळाली. राजश्री प्रॉडक्शन्सचा चित्रपट म्हणजे एकदम संस्कारी, संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन. त्यात काहीही वाईट साईट नाही की शृंगारिक दृश्ये नाहीत. आपला सलमान देखील त्याच मताचा आहे, म्हणजे तो पडद्यापुरतातरी अत्यंत संस्कारी आहे.

सिनेमा हे प्रमुख मनोरंजन साधन : चुंबनदृश्ये करणार नाहीभारतीय चित्रपटांची आणि हिंदी सिनेमांची ‘प्रगती’ झाली आणि शृगांरिक नायक नायिका पडद्यावर दिसू लागल्या. एकेकाळी पडद्यावर वर्ज्य असलेली चुंबन दृश्ये सर्रास दिसू लागली. जवळपास सर्वच छोटे मोठे नायक चुंबनांचा मारा करू लागले. परंतु यापासून लांब होता आणि आहे, तो म्हणजे सलमान खान. सलमानने जणू शपथच घेतली आहे की तो सिनेमामध्ये चुंबनदृश्ये करणार नाही. तो या गोष्टीचे समर्थनही करतो की सिनेमा हे भारतवासीयांचे प्रमुख मनोरंजन साधन आहे. तो सिनेमा आबालवृद्ध सर्वचजण बघत असतात. आपला देश संस्कृतीप्रिय आहे आणि शृंगारिक अथवा नग्नतेने भरलेली दृश्ये कुटुंबासोबत बघताना कसनुस होते. अशा दृश्यांमुळे तरुण मनावर वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी दृश्ये टाळलीच बरी असे सलमानचे म्हणणे आहे.

माध्यमावर अंकुश ठेवण्याची वेळ : नुकतेच सलमानला ओटीटी संदर्भात विचारण्यात आले तेव्हादेखील तो बोलला की, माझ्यामते ओटीटीवर सेन्सॉरशिप आणली गेली पाहिजे. या माध्यमावर उगाचच शिविराळ भाषा वापरली जाते तसेच सेक्स सीन्सचा भरणा असतो. लोकांचे मनोरंजन करताना या गोष्टींचा भरणा केलाच पाहिजे असा काही लोकांचा समज झालेला आहे. सध्या लहान सहन मुलांच्या हातात मोबाईल पोहोचला आहे. त्यांनी असे काही बघितले तर त्यांच्यावर कोणते संस्कार होतील? घरातल्या वरिष्ठ नागरिकांना ते रुचत असेल का? हा सेक्स आणि शिव्यांचा अतिरेक टाळण्यासाठी या माध्यमावर अंकुश ठेवण्याची वेळ आली आहे. जेव्हडा कन्टेन्ट क्लीन असेल तेव्हडे त्याकडे जास्तीत जास्त प्रेक्षक आकृष्ट होऊ शकतील.

माध्यमात न्यूडिटी कंपलसरी झाली आहे : तो पुढे म्हणाला की, या माध्यमात न्यूडिटी कंपलसरी झाली आहे. अनेक कलाकार यासाठी तयार नसतात त्यामुळे ती कलाकृती चांगल्या कलाकारांना मुकते. तसेच चांगल्या कलाकारांना बोल्ड सीन्सना तयार नसल्यामुळे काम मिळत नाही. तसेच ज्यांनी या माध्यमात किसिंग, लव्हमेकिंग, न्यूडिटी वगैरे केली आहे ते जेव्हा आपापल्या घरी जातात तेव्हा सोसायटीतील लोक त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहत असतील? एखादी अदाकारा लिफ्ट मधून जात असताना लिफ्टमन तिचाच लव्हसीन बघत असेल तर तिची काय अवस्था असेल? आपण हिंदुस्थानी आहोत, संस्कारी आहोत. आपल्या समाजात अश्या गोष्टींना थारा नाहीये. फक्त मूठभर लोकांकडून काही गोष्टी केल्या जातात म्हणून संपूर्ण समाज तसा असू शकत नाही. परंतु एक चांगली गोष्ट होतेय ते म्हणजे किसिंग, लव्हमेकिंग, न्यूडिटी ई कमी झाल्याचे आढळ्तेय. सध्या डिजिटल माध्यमावर कॉमेडी आणि कौटुंबिक मालिकांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सलमान खानचा बहुप्रतीक्षित किसी का भाई किसी की जान येत्या २१ एप्रिल ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Namrata Shirodkars Three Musketers : नम्रता शिरोडकरने शेअर केला तिच्या सर्वाधिक प्रिय व्यक्तींचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.