ETV Bharat / entertainment

Hum Dono Song Out: सलमान खानने राजवीर देओल आणि पलोमा यांच्या 'दोनो' या डेब्यू चित्रपटातील रोमँटिक टायटल ट्रॅकचे केले अनावरण... - दोनो रोमँटिक ट्रॅक हम दोनो रिलीज

सलमान खानने इन्स्टाग्रामवर सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमाचा 'दोनो' या चित्रपटामधील टायटल ट्रॅक त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्याने केले आहे.

Hum Dono Song Out
हम दोनो गाणे रिलीज
author img

By

Published : Aug 16, 2023, 7:01 PM IST

मुंबई : सध्या सनी देओलचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'गदर २' चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. दरम्यान आता एक बातमी समोर आली आहे. सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा यांची जोडी राजश्री प्रॉडक्शनच्या 'दोनो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'दोनो' चित्रपटाच्या टीझरनंतर निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला टायटल ट्रॅक रिलीज केला आहे.सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन यांनी हा ट्रॅक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान आणि भाग्यश्री या दोघांनीही आपल्या करिअरची सुरुवात 'मैने प्यार किया' मधून केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तेव्हापासून सलमान चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

'दोनो' रोमँटिक ट्रॅक 'हम दोनो' रिलीज : चित्रपटामधील सनी देओलच्या 'गदर २'चे कौतुक केल्यानंतर, सलमान खानने अलीकडेच राजवीरच्या 'दोनो' या डेब्यू चित्रपटाचा पहिला रोमँटिक ट्रॅक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याशिवाय भाग्यश्री देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'दोनो' चित्रपटामधील गाणे शेअर केले आहे. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत राजवीर देओलच्या 'दोनो' या डेब्यू चित्रपटातील पहिल्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना,कॅप्शनमध्ये लिहिल्या गेले, 'हम दोनों आप सब के लिए... ये दोनों' प्रतिभावान, आणि उगवते स्टार्स राजवीर आणि पलोमाला. 'आमच्याकडून शुभेच्छा'.असे त्यांनी या पोस्टवर लिहले आहे.

सलमान खान-भाग्यश्रीचा 'डोनो'चा टायटल ट्रॅक रिलीज : सलमान खान आणि भाग्यश्री यांचा 'मैने प्यार किया' चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. तेव्हापासून चाहत्यांना त्यांची जोडी आवडली होती. सलमान खान आणि भाग्यश्रीने राजवीरच्या डेब्यू चित्रपटातील पहिला रोमँटिक ट्रॅक लॉन्च केला. राजवीर व्यतिरिक्त बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा अविनाश. एस. बडजात्या हा देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राजवीर आणि पालोमा स्टारर 'दोनो' चे शूटिंग २०२२मध्ये सुरू झाले होते. राजवीरच्या आधी सनी देओलचा मोठा मुलगा करण देखील २०१९ मध्ये 'पल पल दिल के साथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, तो बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला.

हेही वाचा :

  1. Bharaj Jadhav new play : तीन दशके हसवल्यानंतर भरज जाधव प्रेक्षकांन हळवं करणार, नव्या नाटकासाठी सज्ज
  2. Shilpa Shetty : ध्वज फडकावण्याच्या व्हिडिओवर ट्रोल करणाऱ्यांना दिले शिल्पा शेट्टीने प्रत्युत्तर...
  3. Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये 'गदर २' चित्रपट पाहून केला स्वातंत्र्य दिवस साजरा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.