हैद्राबाद : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी सलमान चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या नवीन बांधल्या जाणाऱ्या होटेलसाठी. मुंबईतील वांद्रेमध्ये कार्टर रोडवर सी-फेसिंगवर रोडवर सलमान खान १९ मजली अलिशान हॉटेल बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. दबंगच्या या १९ मजली हॉटेलबद्दल सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे या हॉलेटमध्ये सेलिब्रिटीच नाही तर सलमानचे चाहते देखील येणार असे दिसत आहे.
सलमान खानचे नवीन हॉटेल : मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसीने १९ मजली इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. भाईजानचे नवीन हॉटेल सी-फेसिंग असणार आहे. सलमानच्या या १९ मजली हॉटेलचे नाव त्याच्या आईच्या नाववरून असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच सलमानच्या १९ मजली हॉटेलची उंची ६९.९ मीटर इतकी असणार आहे. शिवाय या हॉटेलचा वापर व्यावसायिक दृष्टीकोनातून केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज कॅफे व रेस्टॉरंट असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे. तर चौथा हा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी असणार आहे. तर पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. यानंतर ७व्या मजल्यापासून ते १९व्या मजल्यापर्यंत अलिशान हॉटेल असणार आहे.
सलमान झळकणार टायगर 3 या चित्रपटात : तसेच काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी काही मुलाखतींमध्ये सांगितले की, त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी गुंतवणूक करायला फार आवडते. ज्याठिकाणी सलमान हॉटेल बांधत आहे त्या परिसरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर आहेत. त्यामुळे सलमानचा हा नवीन बिझनेस पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.सलमान खानच्या जर कामाबद्दल बोलायला गेल तर तो सध्या त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 च्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे. तसेच तो नुकताच लोकप्रिय चित्रपट पठाणमध्ये कॅमिओमध्ये देखील दिसला होता. सलमान खान हा 'किसी का भाई किसी की जान'मध्ये या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.