ETV Bharat / entertainment

सलमान खानचा 'टायगर 3' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - salman khan OTT release date

Tiger 3 OTT Release : अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Tiger 3 OTT Release
टायगर 3 ओटीटी रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:45 AM IST

Updated : Dec 4, 2023, 12:05 PM IST

मुंबई - Tiger 3 OTT Release: अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' गेल्या महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आणि टायगर फ्रँचायझीचा तिसरा पार्ट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. सलमान खानच्या 'टायगर 3'नं जगभरात 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे. देशांतर्गत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आला आहे. दरम्यान, अनेक चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. 'टायगर 3' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ते आपण जाणून घेऊया.

ओटीटीवर 'टायगर 3' : मनिष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा पार्ट असून याआधी 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' हे पार्ट रिलीज झाले होते. या चित्रपटांची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. रुपेरी पडद्यावर या चित्रपटांनीदेखील जबरदस्त कमाई केली होती. यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचे डिजिटल अधिकार अ‍ॅमेझॉन प्राईमकडे आहेत. अ‍ॅमेझॉननं या चित्रपटांचे अधिकार हे मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. त्यामुळं हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. 'टायगर 3'च्या ओटीटी रिलीज तारखेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

'टायगर 3' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी, रिद्धी डोगरा, आशुतोष राणा, रेवती मेनन, अनुप्रिया गोएंका, कुमुद मिश्रा आणि इतर कलाकार आहेत. 'टायगर 3' चित्रपटामध्ये इमरान हाश्मीनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'टायगर 3' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागला आहे. सध्या 'टायगर 3' नं देशांतर्गत 282.08 कोटी रुपये कमवले आहेत. याशिवाय या चित्रपटानं जगभरात 463 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा :

  1. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोराचा व्हिडिओ व्हायरल; झाली ट्रोल
  2. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार केल्याच्या खोट्या बातम्यांवर क्रिती सेनॉनने दिली 'ही' प्रतिक्रिया
  3. कर्करोगामुळं मृत्यूशय्येवर असणाऱ्या ज्युनियर मेहमूदला जॉनी लीव्हरनं दिला धीर, डॉक्टरांचं मोठं विधान

Last Updated : Dec 4, 2023, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.