ETV Bharat / entertainment

'कभी ईद कभी दिवाली'मधील सलमान खानचा फर्स्ट लूक प्रसिध्द - २०२३ ईट कभी ईद कभी दिवाली

सलमान खानने ( Salman Khan ) शनिवारी आगामी 'कभी ईद कभी दिवाली' ( Kabhi Eid Kabhi Diwali ) या चित्रपटातील त्याच्या बहुप्रतिक्षित लूकची झलक दाखवली आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने ( Salman Khan Films ) केली आहे.

सलमान खानचा फर्स्ट लूक प्रसिध्द
सलमान खानचा फर्स्ट लूक प्रसिध्द
author img

By

Published : May 14, 2022, 4:56 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ( Bollywood superstar Salman Khan ) शनिवारी आगामी 'कभी ईद कभी दिवाली' ( Kabhi Eid Kabhi Diwali ) या चित्रपटातील त्याच्या लूकची झलक शेअर केली. सलमानने असेही सांगितले की 2023 च्या ईदसाठी लॉक केलेल्या या चित्रपटाचे शूट सुरू केले आहे.

त्याच्या सोशल मीडिया हँडलवर, सलमानने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो लांब केसामध्ये दिसत आहे. हातात लोखंडी रॉड धरलेला सलमान आक्रमक अवतारात दिसत आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे उघड झालेला नाही पण तरीही 56 वर्षीय सलमानच्या या नवीन लूकमुळे चाहते उत्साहित झाले आहेत.

फर्स्ट लूक शेअर करताना सलमानने लिहिले, "माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे..." यापूर्वी, पूजा हेगडेनेही सोशल मीडियावर 'कभी ईद कभी दिवाली'चे शूट सुरू झाल्याचे संकेत दिले होते. अभिनेत्री पूजा या चित्रपटात एका पारंपारिक छोट्या शहरातील मुलीची भूमिका करत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित कभी ईद कभी दिवाळी या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने ( Salman Khan Films ) केली आहे. या चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा, व्यंकटेश आणि इतर कलाकार देखील आहेत. 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये बिग बॉस 13 फेम शहनाज गिलही पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती आयुषसोबत आहे. हा चित्रपट 2023 च्या ईदला थिएटरमध्ये रिलीज होईल.

हेही वाचा - गर्भवती ट्रान्सजेंडर पुरुषाची जाहीरात केल्याने केल्विन क्लेनवर टीकेची झोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.