ETV Bharat / entertainment

Salman Khan : सर्वच महिला माझ्या बहिणी नाहीत - सलमान खान

भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान मात्र ‘सर्वांचा’ भाईजान नसल्याचे म्हणतो. त्याने ६८ व्या फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२३ च्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हजेरी लावली होती. सलमान यावर्षी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे आणि त्या निमित्ताने प्रायोजक आणि अवॉर्ड्स समितीने सलमान होस्टिंग करणार असल्याचे जाहीर केले.

Salman Khan
सलमान खान
author img

By

Published : Apr 6, 2023, 8:02 PM IST

मुंबई : ‘किसी का भाई किसी की जान’ हा सलमान खानचा नवीन चित्रपट येत आहे. त्याला निचारण्यात आले की, तुम्ही देशाचे भाईजान आहात, तर तुम्ही...? सलमान ने तो प्रश्न मधेच तोडत सांगितले की, मला उगाच सर्वांचा भाईजान बनवू नका. मी काही सर्वांचा भाईजान नाही. मी कोणाची तरी ‘जान’ सुद्धा आहे. ज्यांना मी बहीण मानतो त्यांचा मी भाईजान आहे. इतरांचा नाही.

फिल्मफेअरची महत्त्वपूर्ण भूमिका : पुढे फिल्मफेयर अवॉर्ड्स संदर्भात तो बोलला की, अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग असलेली व्यक्ती म्हणून मी विश्वासाने सांगू शकतो की या उद्योगाच्या वाढीमध्ये फिल्मफेअरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगभरातील आमच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना मी फिल्मफेअर अवॉर्ड्सची नवीनतम आवृत्ती सादर करत आहे. या आवृत्तीचा यजमान म्हणून, प्रत्येकाचे मनोरंजन होईल याची खात्री करणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. हे माझ्याबद्दल नाही, तर प्रेक्षकांबद्दल आहे. अतुलनीय उत्कटतेने आणि उत्साहाने वर्षानुवर्षे टॅलेंट आणि अत्युच्च कामगिरी ओळखणारे असे अविश्वसनीय व्यासपीठ तयार केल्याबद्दल मी फिल्मफेअर टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

खूप मेहनत घेतली : तो पुढे म्हणाला की, खरंतर मी अवॉर्ड्सचा भूका नाही. मी ‘रिवॉर्ड्स’ मध्ये बिलिव्ह करतो. आणि माझे रिवॉर्ड म्हणजे प्रेक्षकांचे प्रेम आहे. गेली कित्येक दशके ते माझ्यावर भरभरून प्रेम करत आहेत. देशभरात कुठेही गेलो की सन्मानाने वागवतात. माझ्या चित्रपटांना प्रोत्साहन देतात. हल्ली हिंदी चित्रपट चालत नाहीत असे म्हटले जाते. चित्रपट न चालण्याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे चित्रपट ‘चांगला’ न बनविणे. या ईद ला माझा किसी का भाई किसी की जान प्रदर्शित होत आहे. माझ्यामते चित्रपट चांगला बनला आहे. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. अर्थात सर्वच जण मेहनत घेतात. परंतु जर का माझा हा चित्रपट चालला नाही तर तुम्ही सर्व माझ्यावर हसाल (जोरात हसत), हे म्हणत की हा काय मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता की बाकीचे ‘चांगला’ चित्रपट बनवत नाहीत.

समाधानकारक उत्तर मिळाले नाही : सलमान खान ने त्याची फिल्मफेयर संदर्भातील एक आठवण शेयर केली. माझा ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित झाला त्यावर्षी मला फिल्मफेयर अवॉर्ड्स अटेंड करण्याचे निमंत्रण मिळाले हे सांगत की मला ‘बेस्ट न्यूकमर’ चे अवॉर्ड देण्यात येणार आहे. मी माझ्या वडिलांना सोबत घेऊन त्या फंक्शनला पोहोचलो. स्टेजवरून अनाउन्समेंट झाली. अँड द बेस्ट न्यूकमर अवॉर्ड गोज टू आणि मी उठलो कारण मला आधीच कळविण्यात आले होते की तो पुरस्कार मला मिळणार आहे. परंतु अचानक मला ऐकू आले ते जॅकी श्रॉफ चे नाव. मी स्तब्ध झालो आणि खुर्चीत बसलो. जॅकी ला अवॉर्ड मिळाला याचा मला आनंदच होता परंतु मला अवॉर्ड मिळणार आहे असे सांगून स्टेजवर ‘फुकटात’ परफॉर्म करण्यासाठी सांगण्यात आले होते असे मला वाटले. माझ्यापेक्षा माझे वडील उद्विग्न वाटले. मी बॅकस्टेज ला गेलो आणि संपादकांना जाब विचारला परंतु त्यांच्याकडून मला काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट मला सांगण्यात आले की मला आता स्टेजवर परफॉर्म करायचे आहे. मी साफ नकार दिला. त्यांनी आर्जव केले परंतु मी नाही म्हणालो. शेवटी ते म्हणाले आम्ही तुला पैसे देतो. त्यांची रक्कम ऐकून मी नाही म्हणालो. शेवटी हो नाही करता त्यांनी मला सुरुवातीच्या ऑफरच्या पाचपट किंमत देऊ केली तेव्हा मी तयार झालो. थोडक्यात पूर्वी अवॉर्ड्स शोजमध्ये परफॉर्म करण्यासाठी पैसे दिले जात नसत. माझ्यामुळे किंबहुना त्यावेळच्या त्या संपादकामुळे आता सर्व आर्टिस्ट्सना परफॉर्मन्सेस चे पैसे मिळू लागले आहेत.

हेही वाचा : Akshay Kumar's entry in Pushpa 2 : पुष्पा २ मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.