ETV Bharat / entertainment

'कभी ईद कभी दिवाली'चे शीर्षक बदलले, 'भाईजान'साठी नव्या कलाकारांची एन्ट्री

author img

By

Published : Jun 7, 2022, 4:29 PM IST

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव बदलण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खानच्या धाकट्या भावांच्या भूमिकेसाठी दोन नव्या अभिनेत्यांचा समावेश होणार आहे. दरम्यान आधी ठरलेले काही कलाकार हा सिनेमा करणार नसल्याचेही समोर आले आहे.

'कभी ईद कभी दिवाली'चे शीर्षक बदलले
'कभी ईद कभी दिवाली'चे शीर्षक बदलले

मुंबई - सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे तो त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तो चर्चेत आला आहे. यावेळी सलमान खान चर्चेत येण्याचे कारण दुसरे काही नसून त्याचा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली' आहे. वास्तविक, 'कभी ईद कभी दिवाळी'चे नाव बदलून आता त्यात काही नव्या अभिनेत्यांचा प्रवेश झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' करण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी. चित्रपटाच्या नावात हा बदल अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

याआधी हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला होता कारण सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा चित्रपटातून स्वत: बाहेर पडला होता. त्यानंतर झहीर इक्बालनेही चित्रपट सोडल्याची बातमी आली होती.

त्याचबरोबर 'कभी ईद कभी दिवाली' अर्थात आता 'भाईजान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पंजाबी गायिका आणि सलमान खानची मैत्रीण शहनाज गिल हिनेही चित्रपट सोडला आहे. मात्र, शहनाज चित्रपटाच्या सेटवर दिसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे या सर्वांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

जस्सी गिल
जस्सी गिल

खरंतर आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांना सलमान खानच्या धाकट्या भावांच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले होते. त्यांनी हा सिनेमा सोडल्याचे समजते, मात्र याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. दरम्यान, या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची आणि गायकाची एंट्री झाल्याची बातमी येत आहे. हे दोघे सलमान खानच्या धाकट्या भावांची भूमिका साकारणार आहेत.

सिद्धार्थ निगम
सिद्धार्थ निगम

सलमानच्या भावांच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगम आणि पंजाबी गायक जस्सी गिल यांची नावे समोर आली आहेत. धूम ३ या चित्रपटात सिद्धार्थने आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या कलाकारांशिवाय राघव जुयाल आणि मालविका शर्मा, पूजा हेगडे आणि व्यंकटेश दुग्गुबाती हे देखील चित्रपटात दिसणार आहेत.

हेही वाचा - सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल रिलेशनशिपमध्ये, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.