मुंबई -Arijit Singh and salman khan : सुपरस्टार सलमान खानं नऊ वर्षांनी गायक अरिजित सिंगला माफ केल्याचं दिसतं आहे. बुधवारी रात्री अरिजित सिंग सलमानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना दिसला. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरिजित हा सलमानच्या घराच्या बाहेर पडत आहे. आता चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की, सलमाननं अरिजितला माफ केलं आहे. अरिजित आणि सलमानने जवळजवळ दशकभराच्या भांडणानंतर अखेर त्यांच्यातील मतभेद संपवले आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
-
Arijit singh Spotted at #SalmanKhan's house Today. What's happening?? #Tiger3 #Tiger3Trailerpic.twitter.com/tLPKUnEN2p
— MASS (@Freak4Salman) October 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arijit singh Spotted at #SalmanKhan's house Today. What's happening?? #Tiger3 #Tiger3Trailerpic.twitter.com/tLPKUnEN2p
— MASS (@Freak4Salman) October 4, 2023Arijit singh Spotted at #SalmanKhan's house Today. What's happening?? #Tiger3 #Tiger3Trailerpic.twitter.com/tLPKUnEN2p
— MASS (@Freak4Salman) October 4, 2023
अरिजितचा व्हिडिओ झाला व्हायरल : सलमान खानच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहलं, 'अरिजित सिंग आज सलमान खानच्या घरी दिसला, काय चालले आहे??' दुसर्या चाहत्यानं अंदाज लावला की ही भेट सलमानच्या आगामी चित्रपट 'टायगर 3'साठी आहे किंवा विष्णुवर्धन आणि करण जोहर सोबतच्या त्याच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या संगीतसाठी आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.
सलमान आणि अरिजितमध्ये काय होता वाद? : सलमान खान हा 2014 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनचं सूत्रसंचालन करत होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये अरिजित सिंगला गाण्यासाठी अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर अरिजित सिंग हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आला, तेव्हा सलमानने अरिजितला सांगितले की, 'तू विजेता आहेस'?. सलमानच्या प्रश्नावर अरिजित सिंह उत्तर दिलं होतं. 'तुम्ही लोकांनी माझी झोप उडवली'. अरिजित सिंगच्या पलटवारानं सलमानला राग आला. त्यानंतर सलमाननं 'बजरंगी भाईजान', 'सुलतान' या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमधून त्याची गाणी काढून टाकली. याप्रकरणावर अरिजीतनं अनेकदा सलमानची जाहीर माफीही मागितली आहे. याशिवाय 2016 मध्ये अरिजीतनं सलमानची जाहीर माफी मागत म्हटले होते की, सुलतानमधील गाण्याचे व्हर्जन कायम ठेवावी. ही विनंती केली होती.
हेही वाचा :