मुंबई - Katrina Salman talk about tiger 4 : सलमान खान, इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर झळकला आणि बॉक्स ऑफिसवर झटपट यशस्वी ठरला. अद्यापही या चित्रपटासाठी लोक थिएटरच्या बाहेर रांगा लावताहेत. तोपर्यंत सलमान खाननं टायगरच्या चाहत्यांसाठी नवी आनंदाची बातमी दिली आहे. त्यानं 'टायगर 4' चित्रपट बनणार असल्याचे संकेत दिले आहेत.
-
#katrinakaif has all praises for her neighbor #ViratKohli𓃵 & @BeingSalmanKhan CONFIRMS #tiger4 !!!! So much in one single clip 😍😍 love how kk's favorite is #ViratKohli𓃵 !!! ❤️❤️❤️ #INDvsAUS pic.twitter.com/QicFQlFSWS
— sanghamitra 🇮🇳 (@sanghamitra_4) November 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#katrinakaif has all praises for her neighbor #ViratKohli𓃵 & @BeingSalmanKhan CONFIRMS #tiger4 !!!! So much in one single clip 😍😍 love how kk's favorite is #ViratKohli𓃵 !!! ❤️❤️❤️ #INDvsAUS pic.twitter.com/QicFQlFSWS
— sanghamitra 🇮🇳 (@sanghamitra_4) November 19, 2023#katrinakaif has all praises for her neighbor #ViratKohli𓃵 & @BeingSalmanKhan CONFIRMS #tiger4 !!!! So much in one single clip 😍😍 love how kk's favorite is #ViratKohli𓃵 !!! ❤️❤️❤️ #INDvsAUS pic.twitter.com/QicFQlFSWS
— sanghamitra 🇮🇳 (@sanghamitra_4) November 19, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी सलमान खान स्टेडियमवर हजर होता. कतरिना कैफसोबत त्यानं टायगर 3 चं प्रमोशनही केलं. यावेळी तो लाईव्ह समालोचनानतही सहभागी झाला होता. यावेळी बोलताना सलमानने 'टायगर 4' चित्रपटाचे संकेत दिले. या चित्रपटातही सलमान टायगरच्या आणि कतरिना झोया या भूमिकेत दिसतील.
यावेळी कतरिना कैफनं विराट कोहलीचं कौतुक केलं. ती म्हणाली, "विराटनं जेव्हा आरसीबीसाठी आयपीएल खेळायला सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि आलेख पाहण्यासारखा आहे." सलमान खान नंतर एक इशारा देण्यासाठी सामील झाला आणि म्हणाला, "तुम्ही टायगर 1 ते टायगर 3 ची प्रतीक्षा 57 पर्यंत केली ना ( सलमान खानचं वय 57 आहे ) आता टायगर 4 ची 60 पर्यंत प्रतीक्षा करा. "
'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' नंतर 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. यात कतरिना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत आणि इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत आहे. 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी दरम्यान रिलीज झाल्यानंतर 'टायगर 3' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि बॉक्स ऑफिसवरही चांगले यश मिळवले.
'टायगर' चित्रपटाच्या या तिसऱ्या सीक्वेलमध्ये रेकॉर्डब्रेक 12 अॅक्शन-पॅक सीक्वेन्सचा भरणा आहे. या चित्रपटातील सलमान खानची एन्ट्रीही थक्क करणारी होती. याव्यतिरिक्त टायगर 3 चित्रपटाचा साउंडट्रॅक, 'रुआन' आणि 'लेके प्रभु का नाम' गाण्याचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झालंय. या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनामध्ये अजूनही मोठं कुतुहल आहे.
हेही वाचा -
2. 'या' तारखेला रिलीज होणार रणबीर कपूर आणि रश्मिका स्टारर 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर
3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर अनुष्का शर्मानं विराटला मारली मिठी