ETV Bharat / entertainment

'सालार'ची धुमधडाक्यात सुरुवात, प्रशांत नीलच्या अ‍ॅक्शनरचे प्रेक्षकांकडून कौतुक - Prabhas fans give thumbs up

Salaar X reactions : प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाला देशभर चाहत्यांच्या प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. प्रशांत नील दिग्दर्शित या अ‍ॅक्शन चित्रपटाचं प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केलं आहे. अनेकांनी प्रभासने ब्लॉकबस्टर पुनरागमन केल्याचं म्हटलंय.

Salaar X reactions
'सालार'ची धुमधडाक्यात सुरुवात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 10:37 AM IST

मुंबई - प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर बहुप्रतिक्षित 'सालार' चित्रपट अखेर शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. जगभरातील प्रभासच्या चाहत्यांनी अतिशय उत्साहानं 'सालार'चं स्वागत केलं. चित्रपटगृहांबाहेर झालेल्या सेलेब्रिशनचे व्हिडिओ आणि सामान्य लोकांच्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रियांनी X हँडल भरुन गेलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाबद्दल तयार झालेल्या सकारात्मक पार्श्वभूमीमुळे 'सालार' येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. हैद्राबादमधील थिएटरमध्ये 'सालार' सुरू होण्यापूर्वी, एका चाहत्याने प्रेक्षक आनंदात नाचतानाचे रेकॉर्डिंग पोस्ट केलं आहे. या व्हायरल व्हिडिओंमध्ये, लोक खूप छान वेळ घालवताना, फटाके लावताना आणि प्रभासच्या प्रचंड 'सालार' कटआउट्ससोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत.

'सालार: भाग 1 - सीझफायर' हा प्रशांत नीलचा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या भारतातील पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या पॅन इंडिया चित्रपटात श्रृती हासन नायिकेच्या भूमिकेत आहे, तर प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. मीनाक्षी चौधरी, सरन शक्ती, जगपती बाबू, टिन्नू आनंद, श्रेय भार्गव यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दोन तास पंचावन्न मिनिटे चालणाऱ्या 'सालार'ला सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं आहे. संपूर्ण चित्रपटात अनेक हिंसक, क्रूर लढाऊ दृश्ये आणि युद्धाची दृश्ये आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना, एका सोशल मीडिया युजरने 'सालार'ला प्रभासचा 'बाहुबली' नंतरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचं म्हटलंय.

X प्रोफाइलवर शेअर केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये आणखी एकाने सांगितले की, चित्रपटात अनेक रोमांचक क्षण आहेत. सालारचा दिग्दर्शक प्रशांत नील सध्या X वर लोकप्रिय झाला आहे. तर दुसरीकडे प्रभासचे चाहत्यांसाठी हा चित्रपट आनंदाची पर्वणी ठरत आहे.

प्रभासची भूमिका असलेले 'आदिपुरुष' आणि 'राधे श्याम' हे यापूर्वी रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयेशी ठरले होते. यापार्श्वभूमीवर प्रभासचा सुवर्णकाळ परत आला असल्याची भावना चाहते त्यांच्या प्रतिक्रियातून व्यक्त करत आहेत. त्याची अभिनय क्षमता आणि प्रतिभा 'सालार'मध्ये त्यानं दाखवून दिल्याचीही लोकभावना प्रतिक्रियातून जाणवत आहे.

'सालार' आणि यशचा लोकप्रिय चित्रपट 'केजीएफ' यांचा संबंध आहे की नाही याबद्दल खूप दिवसांपासून सर्वांना उत्सुकता होती. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे हे दोन्ही चित्रपट एकमेकांशी संबंधित नाहीत. "सलारचा कोणताही पैलू केजीएफशी संबंधित नाही," असं दिग्दर्शकाने घोषित केले होते.

  • #BlockbusterSALAAR

    4 Full bottles Tagina Rani High #Salaar chuste vostadi

    This is not just any movie, it’s an emotion
    The elevations ,#Prabhas mass Screen presence , the fights & sentiment put u on a high

    Movie gives a high that 4 Full liquo bottles can’t

    This scene 🔥 pic.twitter.com/e3VJ5ziadO

    — Ravi @🔥🔥Prabhas Army 🔥🔥🦕 (@RaviPrabhas333) December 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Also read:

  1. शाहरुख खान स्टारर 'पठाण' आणि 'जवान'चे ओपनिंग डे रेकॉर्ड तोडण्यात 'डंकी' अपयेशी
  2. पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतरही तमन्ना भाटिया आहे साऊथ आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
  3. 'वेलकम'ला 16 वर्षे पूर्ण, अक्षय कुमारनं शेअर केला 'वेलकम टू द जंगल'मधील सीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.