मुंबई : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा क्रेझ रिलीजपूर्वीच पाहायला मिळत आहे. याशिवाय प्रभासचा 'सालार' चित्रपट देखील सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 'जवान' हा सालारसोबत रूपेरी पडद्यावर संघर्ष करणार नाही, मात्र तरीही या चित्रपटांची तुलना होताना दिसत आहे. या दोन्ही चित्रपटांची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत. हे दोन्ही चित्रपट एकमेकांशी भिडू नयेत, अशी निर्मात्यांची इच्छा असली, तरीही या चित्रपटांमध्ये रिलीजपूर्वीच स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे. 'जवान' 7 सप्टेंबरला तर 'सालार' 28 तारखेला रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'जवान' आणि 'सालार' खूप नोटा छापत असल्याचे सध्या दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सालार' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग : सध्या या दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगची तुलना होत आहे. शाहरुख खानच्या 'जवान'चे शो प्रभासच्या सालारपेक्षा जास्त आहेत. प्रभासच्या आगामी 'सालार'चे तिकिटे 14619 तिकिटे विकली गेली आहेत. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने 3.45 कोटीची कमाई केली आहे. हा डेटा 28 ऑगस्टपर्यंतचा असून हा चित्रपट आणखी कमाई करेल असे दिसत आहे. प्रभासचा उत्तर अमेरिकेत चांगला चाहता वर्ग आहे. त्यामुळे हा चित्रपट येणाऱ्या काळात बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करेल. यापूर्वी प्रभासचा 'आदिपुरुष' हा खूप वाईटप्रकारे फ्लॉप झाला होता, त्यामुळे त्याला या चित्रपटाकडून अपेक्षा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जवान' चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग : जवानाबद्दल बोलायचे झाले तर मनोबाला विजयबालन यांनी परदेशातील अहवाल ट्विटवर शेअर केला आहे. 28 ऑगस्ट रोजी 'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तिकिटे 13750 विकली गेली आहेत. या चित्रपटाने रिलीजपूर्वी 1.74 कोटी कमाई केली आहे. 'जवान'चे 1884 शो आहेत . किंग खान स्टारर चित्रपटाचा क्रेझ हा अमेरिकेत बघायला मिळत आहे. दरम्यान आता बुक माय शोबद्दल बोलायचे झाले तर, ३० ऑगस्टपर्यंत शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटामध्ये 326 लोकांनी रस दाखविला आहे. शाहरुखचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील किंग खानच्या 'पठाण' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.
हेही वाचा :