मुंबई - Salaar release trailer: 'सालार: भाग 1 - सीझफायर' चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढलेली असताना या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाचा या बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. होंबळे फिल्म्सने 18 डिसेंबर रोजी सालार रिलीज ट्रेलरचे लॉन्चिंग केले. ही प्रमोशनल अॅसेट एक रोमांचकारी झलक देणारी आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी साकारलेली सालारची दुनिया अतिभव्य आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या दोन भागांच्या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, बॉबी सिम्हा आणि जगपती बाबू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सुमारे तीन मिनिटांच्या 'सालार' ट्रेलरमध्ये खानसार या काल्पनिक शहराची ओळख करून देण्यात आली आहे. हाय-व्होल्टेज अॅक्शन सीक्वेन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये प्रभास अतिशय बलदंड दिसत असून त्याचा अनोखा आक्रमक अवतार यात पाहायला मिळत आहे. यात प्रभासला देवाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यात देवा पृथ्वीराज सुकुमारन याने साकारलेला त्याचा मित्र वरधराज मन्नारसाठी काहीही करायला तयार असलेला वन-मॅन आर्मी आहे. या बालपणीच्या मित्रांचे कट्टर-शत्रूंमध्ये रूपांतर या चित्रपटाच्या पहिल्या भागात होताना पाहायला मिळेल. सालार रिलीजच्या ट्रेलरमध्ये श्रुती हासनचीही झलक पाहायला मिळतेय.
-
Good things take time. Rome wasn't built in a day and neither are masterpieces. 🙏
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Good things take time. Rome wasn't built in a day and neither are masterpieces. 🙏
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023Good things take time. Rome wasn't built in a day and neither are masterpieces. 🙏
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023
आज सकाळपासून या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू होती. नियोजित वेळेनुसार ट्रेलर सकाळी 10:45 वाजता लॉन्च केला जाणार होता. नंतर दुपारी 2 वाजता लॉन्च होणार असल्याचं समजलं पण प्रत्यक्ष साडेतीन वाजेपर्यंत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचल्यानंतर ट्रेलर अखेर रिलीज झाला.
-
The #SalaarReleaseTrailer might have hit the snooze button, but fear not! It's set to be out 2 PM 🔥 Stay Tuned!
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The #SalaarReleaseTrailer might have hit the snooze button, but fear not! It's set to be out 2 PM 🔥 Stay Tuned!
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023The #SalaarReleaseTrailer might have hit the snooze button, but fear not! It's set to be out 2 PM 🔥 Stay Tuned!
— Hombale Films (@hombalefilms) December 18, 2023
ट्रेलर लॉन्च होण्याआधी होंबळे फिल्म्सने चाहत्यांना धीर धरण्याचे आवाहन केले होते, "चांगल्या गोष्टींना वेळ लागतो. रोम एका दिवसात बांधला गेला नाही." अशा आशयाचं वाक्य शेअर करत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
-
UPLOADING.... PLEASE I KINDLY REQUEST.#SalaarReleaseTrailer
— Salaar (@SalaarTheSaga) December 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">UPLOADING.... PLEASE I KINDLY REQUEST.#SalaarReleaseTrailer
— Salaar (@SalaarTheSaga) December 18, 2023UPLOADING.... PLEASE I KINDLY REQUEST.#SalaarReleaseTrailer
— Salaar (@SalaarTheSaga) December 18, 2023
'सालार' चित्रपटाची टीम प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि दिग्दर्शक प्रशांत नील यांची खास मुलाखत प्रदर्शित केली जाणार आहे. सालार त्रिकुटाची मुलाखत प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली घेणार आहेत. या चर्चेमध्ये सालारच्या निर्मितीच्या अनेक पडद्या मागल घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">