मुंबई - Salaar Movie : गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या चाहत्यांच्या मनात 'सालार' चित्रपटाविषयी खूप उत्सुकता लागली होती. अनेकजण हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही या संभ्रमात होते. पण आता निर्मात्यांनीच अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. निर्मात्यांच्या मते, प्रभास स्टारर 'सालार' चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार नाही. तसंच या चित्रपटाची नवीन रिलीज डेटही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'सालार' रिलीजची तारीख पुढं ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी याबाबत मौन बाळगलं होतं.
-
#Salaar Exclusive Satellite rights Bagged by Star Group for a Record Price 🥵🔥
— Rohit Bhosale (@RohitBh89467641) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
As Per the Buzz, #Prabhas's #SalaarCeaseFire Overall Non Theatrical Rights Sold for 350crs.
ALL TIME RECORD FOR ANY INDIAN FILM🔥🔥🔥#SalaarComingSoon #Salaar #PrashanthNeel @SalaarTheSaga pic.twitter.com/YOJNReC2VD
">#Salaar Exclusive Satellite rights Bagged by Star Group for a Record Price 🥵🔥
— Rohit Bhosale (@RohitBh89467641) September 13, 2023
As Per the Buzz, #Prabhas's #SalaarCeaseFire Overall Non Theatrical Rights Sold for 350crs.
ALL TIME RECORD FOR ANY INDIAN FILM🔥🔥🔥#SalaarComingSoon #Salaar #PrashanthNeel @SalaarTheSaga pic.twitter.com/YOJNReC2VD#Salaar Exclusive Satellite rights Bagged by Star Group for a Record Price 🥵🔥
— Rohit Bhosale (@RohitBh89467641) September 13, 2023
As Per the Buzz, #Prabhas's #SalaarCeaseFire Overall Non Theatrical Rights Sold for 350crs.
ALL TIME RECORD FOR ANY INDIAN FILM🔥🔥🔥#SalaarComingSoon #Salaar #PrashanthNeel @SalaarTheSaga pic.twitter.com/YOJNReC2VD
'सालार' संबंधित अपटेड : 'आदिपुरुष' चित्रपटाच्या अपयशानंतर प्रभासचे चाहते 'सालार'ची वाट पाहात आहेत. 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटाबाबत, चाहत्यांना अपेक्षा होती की हा चित्रपट प्रभासला वेगळ्या शैलीत सादर करेल आणि पुन्हा एकदा प्रभासला त्याची पूर्वीची जागा मिळेल. यामुळेच चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लोक लक्ष ठेवून आहेत. 'सालार'चा टीझर हा प्रेक्षकांनी खूप पसंत केला. मात्र त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाविषयी कुठलीही अपडेट दिली नाही. 28 सप्टेंबर ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
प्रदर्शनाची तारीख लवकरच कळेल : होम्बल फिल्म्सनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं, 'तुमच्या पाठिंब्याचे आम्ही कौतुक करतो. पण काही कारणास्तव 28 सप्टेंबरची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. कारण तुम्हाला सिनेमाचा चांगला अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे. फक्त तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमची टीम रात्रंदिवस मेहनत करत आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाईल' तुमच्या अटळ पाठिंब्याचं आम्ही मनापासून कौतुक करतो' अशी पोस्ट करण्यात आली आहे. 'सालार' हा एक उत्तम चित्रपट आहे हे टीझरवरून समजत आहे. प्रत्येकजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी निर्माते मेहनत घेत आहेत.
हेही वाचा :