ETV Bharat / entertainment

Sajni shinde ka viral video Movie : 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' 'या' दिवशी होणार प्रदर्शित... - राधिका मदन

Sajni shinde ka viral video Movie :'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट एका हत्याकांडावर आधारित असणार आहे. दरम्यान या चित्रपटासाठी अभिनेता अभिताभ बच्चननं नम्रताला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sajni shinde ka viral video Movie
साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 5:33 PM IST

मुंबई - Sajni shinde ka viral video Movie : दिनेश विजानचा 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट चित्तथरारक हत्याकांडावर आधारित आहे.'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या शीर्षकातूनच प्रेक्षकांचा उत्साह निर्मात्यांनी वाढवला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका मदन आणि निम्रत कौर दिसणार आहेत. 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' चित्रपटाचा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपट खूप रहस्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटासाठी आता दिग्गज अभिनेता अभिताभ बच्चन यांनी नम्रता कौरला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्रेलरमध्ये काय आहे? : 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट कथित आत्महत्येच्या प्रयत्नात पुलावरून नदीत उडी मारून मृत मानलेल्या शाळेतील बेपत्ता शिक्षिका सजिनी शिंदे (राधिका मदन) हिच्या जीवनावर आधारित असणार आहे. ट्रेलरमध्ये असं दिसतं की तिच्या शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप लीक झालेली आहे. या चित्रपटामध्ये सुमीत व्यास, भाग्यश्री, सुबोध भावे, सोहम मजुमदार, चिन्मय मांडेकर, श्रुती व्यास, आशुतोष गायकवाड आणि रश्मी आगडेकर हे कलाकार दिसणार आहे. 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे यांनी केले असून परिंदा जोशी यांनी सहलेखन केले आहे.

निम्रत आणि राधिका यांचा 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ': निम्रतनं गेल्या वर्षी नेटफ्लिक्स इंडियावर प्रदर्शित झालेल्या 'मॅडॉक'च्या दहाव्या, तुषार जलोटाच्या सोशल कॉमेडीमध्येही राजकारणी म्हणून काम केले होते. दुसरीकडे, राधिकानं यापूर्वी तीन मॅडकॅप प्रकल्पांमध्ये काम केले आहे. तिनं होमी अदजानियाचा 2020 मधील 'अंग्रेजी मीडियम'मध्ये काम केलं आहे. याशिवाय कुणाल देशमुखचा 2021 चा रोमँटिक चित्रपट 'शिद्दत'मध्ये देखील ती दिसली आहे. निम्रत आणि राधिका स्टारर 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याच तारखेला, विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित विक्रांत मॅसी अभिनीत '12 वी फेल' देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय त्या दिवशी उमेश शुक्लाचा कॉमेडी 'आंख मिचौली' प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे.

हेही वाचा :

  1. Bharat Jadhav new Drama Astitva : भरत जाधवचं 'अस्तित्व' नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला ; कधी होणार प्रयोग जाणून घ्या...
  2. Leo Box Office Collection Day 6: थलापथी विजय स्टारर 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर मारली बाजी; रिलीजच्या सहाव्या दिवशी करेल इतकी कमाई...
  3. Bigg Boss 17 : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांच्या आयुष्यातील रहस्ये येणार समोर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.