मुंबई - Saif Ali Khan split with Amrita Singh : 'कॉफी विथ करण 8' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान शोच्या सोफ्यावर विरजमान झालेले दिसले. सैफच्या बालपणीच्या गोष्टींपासून ते शर्मिलाच्या सदाबहार चित्रपटांपर्यंत, मायलेकाच्या या जोडीने होस्ट करण जोहरशी संभाषण करताना अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. त्यांनी अभिनेता अमृता सिंगसोबत सैफच्या पहिल्या लग्नाबद्दलही सांगितले.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे ऑक्टोबर 1991 मध्ये लग्न झाले होते. मात्र 13 वर्षे संसार केल्यानंतर हे जोडपं विभक्त झाले. याकाळात त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन अपत्ये झाली. लग्न झाले तेव्हा सैफ अली खान अवघ्या २१ वर्षाचा होता आणि अमृता सिंग ३३ वर्षांची होती. सैफने इतक्या लहान वयात लग्न करण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता सैफने उत्तर दिले, "हे एक प्रकारे घरातून पळून जाणं होतं. मला बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत आणि मला एक प्रकारची सुरक्षा मिळाली ती एक कल्पना म्हणून खूप छान वाटतं. यातून आपण घर बनवू असे वाटत होते."
शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या की, सैफ आणि अमृता सिंग दोघेही अनेक प्रकारे सारखेच होते. "दोघंही खूप सारखेच होते. दोघेही खूप मजेदार होते. जेव्हा ते बोलायचे तेव्हा खूप हसायचे, इतर लोकांची नक्कल करायचे, विनोदी पद्धतीने कुणाला तरी फाडायचे. तो मिमिक्री करण्यात चांगला आहे आणि ती एक उत्तम कथाकार आहे. ते एकत्र खूप आनंदी दिसत होते," असे शर्मिला म्हणाल्या.
अमृतापासून विभक्त होण्याच्या आठवणी सांगताना सैफने खुलासा केला की अमृतापासून वेगळे होणार असल्याचं सर्वात पहिल्यांदा आईला समजले. "वेगळे झाल्याबद्दल मला एवढेच सांगायचे आहे की, विभक्त होण्याआधी मी पहिल्यांदा माझ्या आईशी बोललो. त्यावेळी तिनं एक दीर्घ श्वास घेतला, फोनवर एक पॉज आला आणि म्हणाली, 'ते जर तुला अपेक्षित असेल तर मी तुझ्यासोबत आहे आणि मला त्याचा खूप फायदा झाला," असे तो म्हणाला.
त्यांच्या विभजनानंतरचा काळ फारसा सामंजस्यपूर्ण नव्हता असे शर्मिला यांनी सांगितले. "जेव्हा तुम्ही इतके दिवस एकत्र असाल आणि तुम्हाला अशी सुंदर मुले असतील, तेव्हा कोणतंही ब्रेकअप होणं हे सोपं नसतं. मग त्यात सामंजस्य नसते... मला माहित आहे की त्या टप्प्यावर एकोपा असणे कठीण आहे, प्रत्येकजण दुखावला जातो... त्यामुळे तो काळ छान नव्हता पण मी प्रयत्न केला. इतकं सगळं घडून गेल्यानंतर काही काळ जायाला हवा होता."
शर्मिला पुढे म्हणाली की कुटुंबासाठी हा आनंदाचा काळ नव्हता कारण त्यांनी केवळ अमृताच नाही तर तिची आणि सैफची मुले देखील दुरावली होती. "फक्त दूर राहणे नाही, तर इतरही अनेक गोष्टी यात गुंतलेल्या आहेत. आमच्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता कारण इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आम्हाला मुलांची खूप आवड होती. विशेषतः, टायगरला इब्राहिमची खूप आवड होती आणि तो म्हणायचा 'तो चांगला मुलगा आहे.' त्याला त्याच्यासोबत तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे अमृता गमावणे आणि दोन मुले गमावणे हे आम्हाला दुप्पट वाटले. त्यामुळे फक्त सैफलाच नाही तर आम्हालाही या सगळ्याशी जुळवून घ्यावे लागले," अशे शर्मिला पुढे म्हणाल्या.
हेही वाचा -