मुंबई - ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साऊथचा अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसत आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला या चित्रपटात रावणाची महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रभास आणि क्रिती सेनॉनची जोडी पाहून चाहते खूप खूश आहेत. त्याचवेळी सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर यूजर्स संतापले आहेत. रावणाच्या भूमिकेतील सैफचे वर्णन युजर्स मुघल शासक म्हणून करत आहेत.
-
I mean seriously!!! Are they going to change the name of ravan to rizwan ?? Who is styling his beard ?? Javid Habib ?? They have made him look like alauddin khilji 😂😂😂#AdipurushMegaTeaserLaunch #Adipurush #disappointed #animation pic.twitter.com/MGZTtqqicz
— உன்னைப்போல் ஒருவன் (@Sandy_Offfl) October 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I mean seriously!!! Are they going to change the name of ravan to rizwan ?? Who is styling his beard ?? Javid Habib ?? They have made him look like alauddin khilji 😂😂😂#AdipurushMegaTeaserLaunch #Adipurush #disappointed #animation pic.twitter.com/MGZTtqqicz
— உன்னைப்போல் ஒருவன் (@Sandy_Offfl) October 2, 2022I mean seriously!!! Are they going to change the name of ravan to rizwan ?? Who is styling his beard ?? Javid Habib ?? They have made him look like alauddin khilji 😂😂😂#AdipurushMegaTeaserLaunch #Adipurush #disappointed #animation pic.twitter.com/MGZTtqqicz
— உன்னைப்போல் ஒருவன் (@Sandy_Offfl) October 2, 2022
खिलजी जास्त दिसतोय - सैफ अली खान आणि त्याच्या पुष्पक विमानापर्यंत सगळ्यांनाच ट्रोल केले जात आहे. सैफला पाहून ट्रोल्स म्हणत आहेत की, अभिनेता रावण कमी आणि अलाउद्दीन खिलजी अधिक दिसतो.
रावण की रिझवान? त्याचवेळी काही युजर्सनी सैफचा रावणाच्या भूमिकेतला लूक पाहून आश्चर्यचकित केले आहे. लूकबद्दल बोलताना, सैफ अली खानला स्पाइक हेअरस्टाईल, लांब दाढी, डोळ्यात मस्करा घातलेला पाहून एका यूजरने लिहिले, ''खरंच? रावणाचे नाव बदलून रिजवान ठेवण्यात आले आहे का? अशा दाढीला कोण स्टाईल देतो? जावेद हबीब? त्याने सैफ अली खानला अलाउद्दीन खिलजी बनवले आहे.''
-
Is this a joke? It is totally disappointing #BoycottbollywoodCompletely #DisappointingAdipurish pic.twitter.com/ZOO4zvz6po
— Rishabh Indraniya (@Mr_Indraniya) October 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Is this a joke? It is totally disappointing #BoycottbollywoodCompletely #DisappointingAdipurish pic.twitter.com/ZOO4zvz6po
— Rishabh Indraniya (@Mr_Indraniya) October 3, 2022Is this a joke? It is totally disappointing #BoycottbollywoodCompletely #DisappointingAdipurish pic.twitter.com/ZOO4zvz6po
— Rishabh Indraniya (@Mr_Indraniya) October 3, 2022
एका यूजरच्या मते, सैफ अली खानने रावणाला मुघल स्टाईल देण्याची कल्पना दिली असावी. सैफचा लूक पाहिल्यानंतर युजरने लिहिले, 'हा विनोद आहे का? हे पूर्णपणे निराशाजनक आहे'.
पुष्पक विमानवरही ट्रोल - त्याचवेळी सैफचा पुष्पक विमान पाहून चाहत्यांचीही तारांबळ उडाली आहे. रामायण टीव्ही मालिकेमध्ये एक अतिशय सुंदर पुष्पक विमान दिसले होते, पण दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष'ची तुलना हॉलिवूड चित्रपट 'गेम ऑफ थ्रोन्स'शी करण्यात आली आहे.
-
THIS IS HIGHLY HIGHLY HIGHLY DISAPPOINTING 😑
— Himanshu Ahlawat (@HimanshuAhlawa1) October 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A 500cr Cartoon movie 🙄
and that disgusting Ravana Look!#Prabhas could have carried that #Bahubali look rather than this animated Joke!#OmRaut #AdipurushMegaTeaserLaunch #cartoonmovie #dissapointed #DisappointingAdipurish #PRABHAS pic.twitter.com/p7fo3lpdG9
">THIS IS HIGHLY HIGHLY HIGHLY DISAPPOINTING 😑
— Himanshu Ahlawat (@HimanshuAhlawa1) October 2, 2022
A 500cr Cartoon movie 🙄
and that disgusting Ravana Look!#Prabhas could have carried that #Bahubali look rather than this animated Joke!#OmRaut #AdipurushMegaTeaserLaunch #cartoonmovie #dissapointed #DisappointingAdipurish #PRABHAS pic.twitter.com/p7fo3lpdG9THIS IS HIGHLY HIGHLY HIGHLY DISAPPOINTING 😑
— Himanshu Ahlawat (@HimanshuAhlawa1) October 2, 2022
A 500cr Cartoon movie 🙄
and that disgusting Ravana Look!#Prabhas could have carried that #Bahubali look rather than this animated Joke!#OmRaut #AdipurushMegaTeaserLaunch #cartoonmovie #dissapointed #DisappointingAdipurish #PRABHAS pic.twitter.com/p7fo3lpdG9
त्याचवेळी सैफ एका भयानक प्राण्यावर स्वार होताना दिसत आहे. वापरकर्ते या पुष्पक विमान प्राण्याला वटवाघुळ म्हणत आहेत. ओम राऊतने हा चित्रपट बनवण्यात 500 कोटींची उधळपट्टी कशी केली हे पाहून यूजर्सचा संताप अनावर होत आहे.
आदिपुरुषचे फर्स्ट लूक पोस्टर - आदिपुरुष चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरबद्दल सांगायचे तर, साऊथ अभिनेता प्रभास भगवान 'राम'च्या भूमिकेत असून तो आकाशाकडे बाणांनी निशाणा साधत आहे. प्रभासचे लांब आणि कुरळे केस आणि मिशा त्याच्या लूकला पूरक आहेत.
चित्रपटाची स्टारकास्ट - ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत असणार आहेत. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - मास्क निकालना पडेगा: जया बच्चनला दुर्गापूजेत मास्क न काढल्यामुळे काजोलने चिडवले