मुंबई : साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ही सध्या चर्चेत आली आहे. नुकतीच साईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून साई ही अमरनाथ यात्रेवर होती. या यात्रेचे फोटो पोस्ट करत तिने आपल्या चाहत्यांना धार्मिक प्रवासाची झलक दाखविली आहे. तिने पहिला फोटो आपल्या आई वडिलांचा पोस्ट केला आहे. याशिवाय तिने तिच्या प्रवासाचा एक व्हिडिओ आणि तिचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने खूप लांबलचक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, तिने तिच्या आई-वडिलांसोबत आपली पहिली अमरनाथ यात्रा पूर्ण केली आहे. त्याचबरोबर तिने यात्रे संबंधित काही अनुभव या पोस्टमध्ये शेअर केले आहे.
साई पल्लवीने घेतले अमरनाथचे दर्शन : साईने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तिला तिचे वैयक्तिक अनुभव कोणाशीही शेअर करणे योग्य वाटत नाही, परंतु ती अमरनाथ यात्रा खूप खास मानते आणि ती तिच्या चाहत्यांशी तिचे अनुभव शेअर करू इच्छिते. पुढे तिने लिहले, वयाच्या ६०व्या वर्षी तिच्या आई-वडिलांना अमरनाथ यात्रेला घेऊन जाणे हे तिच्यासाठी आव्हानात्मक होते. माझ्या आई वडील कडाक्याच्या थंडीत छातीला हात लावून घसरणाऱ्या वाटांवर जात असताना त्यांच्यावर विशेष लक्ष देणे हे माझ्यासाठी खूप कठीण होते. त्यानंतर मी देवाला विचारले की तुम्ही इतक्या दूर का आहात.
अभिनेत्रीला आयुष्यातला एक मोठा धडा मिळाला : पुढे तिने सांगितले की, मला अमरनाथहून परतल्यानंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, की, तिथे जाण्यापूर्वी लोक इतका विचार का करतात, जेव्हा मी डोंगराखाली फिरत होते, तेव्हा मी तेथे अनेक अद्भुत दृश्ये पाहिली, काही लोक मधेच प्रवास सोडून परत जात आहेत. तेव्हा काही लोकांनी ओम नमः शिवाय हा जप सुरू केला आणि परत गेलेले प्रवाशी पुन्हा यात्रेमध्ये सामील झाले. त्यांनी आपला प्रवास चालू ठेवला. याठिकाणी घोडे आणि गावकरी भाविकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत होते. या प्रवासात मला पवित्र गुफांमध्ये महादेवाची पूजा करताना अनेक भाविक लोक दिसले'.
अमरनाथ यात्रेतून अभिनेत्रीला मोठे आव्हान मिळाले : साईने सर्व लोकांचे आणि संस्थांचे आभार मानले, ज्यांच्यामुळे तिची अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पार पडली. यामध्ये तिने श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड, आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांचेही आभार मानले आहेत. तिने तिच्या शेवटच्या ओळींमध्ये लिहिले आहे, 'अमरनाथ हे एक पवित्र स्थान आहे, जिथे मला लोक निस्वार्थपणे इतरांची सेवा करताना आढळले, आपली संपत्ती, सौंदर्य आणि शक्ती असूनही, आपल्याकडे इच्छाशक्ती, शरीर आणि हृदय आहे, जी इतरांना मदत करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. अमरनाथ यात्रेने माझ्यात इच्छाशक्ती जागवली आहे आणि माझ्या शरीराची चाचणी घेतली आहे आणि जर आपण या जगात एकमेकांसोबत उभे राहिलो नाही तर आपला अंत लवकरच होईल, असे तिने पोस्टमध्ये सांगितले आहे.
हेही वाचा :