ETV Bharat / entertainment

Chrisann Pereira : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अडकलेली क्रिसन परेराची निर्दोष सुटका... - क्रिशन परेराला क्लीन चिट मिळाली

क्रिसन परेराची यूएईमधील शारजाह तुरुंगातून सुटका झाली आहे. क्रिसन आता मुंबईत परतली आहे. एप्रिलमध्ये तिची निर्दोष मुक्तता झाली असली तरी कायदेशीर कारवाईमुळे तिला परत येण्यास विलंब झाला होता.

Chrisann Pereira
क्रिसन परेरा
author img

By

Published : Aug 3, 2023, 3:50 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेरा यूएईमधील शारजाह तुरुंगातून सुटका करून भारतात परतली आहे. क्रिसन परेराला १ एप्रिल रोजी ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आता क्रिसन शारजाहून मुंबईत परतली आहे. ती मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे तिने सांगितले आहे. महेश भट्ट दिग्दर्शित बॉलीवूड चित्रपट 'सडक २'मध्ये काम करणारा क्रिसनला, १ एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर ड्रग्ज सापडल्याने पकडण्यात आले होते. पुरस्काराच्या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला शारजा पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती.

ड्रग्ज प्रकरण : क्रिसन परेरा मुंबईत परतल्यावर तिचा भाऊ केविन परेराने आनंद व्यक्त केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'क्रिसन अखेर परत आली आणि आम्हाला भेटली, मला माहित होते की ती परत येईल मी जूनमध्ये सांगितले होते, पण यास थोडा वेळ लागला आणि शेवटी परत आली. एप्रिलमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने क्रिशन परेराला ड्रग्ज तस्करी प्रकरणात फसवल्याप्रकरणी बेकरी मालक अँथनी पॉल (वय ३५ वर्षे) आणि त्याचा बँकर पार्टनर राजेश बोभाटे (३४ वर्षे) या दोघांना अटक केली होती. या दोघांनी ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपवून ठेवल्याचे चौकशीत सांगितले. क्रिसन परेरा नकळत जाळ्यात अडकली, असे त्यांनी कबूल केले.

क्रिशन परेराला क्लीन चिट मिळाली : गेल्या महिन्यात शारजाहच्या अधिकाऱ्यांनी परेरा कुटुंबीयांना कळवले होते की क्रिशनचा पासपोर्ट भारतात परतण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समितीकडे पाठवण्यात आला आहे. ट्रॅव्हल ब्लॅकलिस्टमधून तिचे नाव वगळण्याबाबत समिती आढावा घेत होती. दरम्यान, शारजा न्यायालयाने तिला या प्रकरणात भारत सरकारच्या विनंतीवरून राजनयिक माध्यमाद्वारे एप्रिलमध्ये क्लीन चिट दिली. या तपासादरम्यान, आरोपीने वैमनस्यातून क्लेटन रॉड्रिग्ज, मोनिशा डिमेलो, हृषिकेश पांड्या आणि केन रॉड्रिग्ज या चार पीडितांवर अशाच प्रकारे ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याचे मान्य केले.

हेही वाचा :

  1. Na Dho Mahanor passed away: मराठी मातीतला 'रानकवी' हरपला, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली
  2. Salman Khan And Arpita Khan : सलमान खानने बहीण अर्पिता खानला एक थ्रोबॅक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  3. Manish Paul Birthday : मनीष पॉलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.