ETV Bharat / entertainment

सबा आझाद 'मिनिमम'च्या शुटिंगसाठी सज्ज, साकारणार फ्रेंच मुलीची भूमिका - Minimum shooting

'रॉकेट बॉईज' या चित्रपटामध्ये परवाना इराणीची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद तिच्या 'मिनिमम' नावाच्या पुढील प्रोजेक्टवर काम करणार आहे. यामध्ये ती फ्रेंच मुलीची भूमिका साकारणार आहे.

सबा आझाद
सबा आझाद
author img

By

Published : Jun 14, 2022, 1:24 PM IST

मुंबई - 'रॉकेट बॉईज' या चित्रपटामध्ये परवाना इराणीची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद तिच्या 'मिनिमम' नावाच्या पुढील प्रोजेक्टवर काम करणार आहे. यामध्ये ती फ्रेंच मुलीची भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री सबा आझाद सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे. शुटिंग शुक्रवारी सुरू होत आहे आणि त्याबद्दल तिला बरेच काही बोलायचे आहे.

ती म्हणाली, "माझ्या पुढील प्रोजेक्ट 'मिनिमम'साठी रोजचे क्लासेस झाले आहेत, मला आशा आहे की सर्व काही नीट पार पडेल. सिनेमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला नवीन कौशल्ये शिकायला मिळतात. या महिन्याच्या 17 तारखेपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे."

"कोविड प्रतिबंध कमी झाल्यापासून आणि लाइव्ह परफॉर्मन्स आणि म्युझिक फेस्टिव्हल पुन्हा सुरू झाल्यापासून माझ्या 'मॅडबॉय/मिंक' बँडसह पुन्हा मार्गावर परतल्याने भारी वाटत आहे. आम्ही एका म्युझिक व्हिडिओवर काम करत आहोत, 'मिनिमम'चे शूट पूर्ण झाल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ रिलीजकरणार आहोत.", असे ती पुढे म्हणाली.

सबाने अलीकडेच करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचा कथित प्रियकर हृतिक रोशनसोबत एन्ट्री केल्यानंतर ती बातम्यांमध्ये झळकली होती.

हेही वाचा - एआर रहमानने रिलीज केला मुलगी खतिजाच्या लग्नाचा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.