ETV Bharat / entertainment

Rumoured lovebirds Ananya and Aditya : कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची अमन गिलच्या रिसेप्शनला हजेरी - आदित्य रॉय कपूर लेटेस्ट न्यूज

Rumoured lovebirds Ananya and Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे बॉलिवूडमधील कथित जोडपे निर्माता अमन गिलच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगली आहे. यावेळी दोघांनी पापाराझींसाठी स्वतंत्रपणे पोज दिल्या.

Rumoured lovebirds Ananya and Aditya
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 9:51 AM IST

मुंबई - Rumoured lovebirds Ananya and Aditya : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या चर्चा नेहमी रंगत असतात. अनेक वेळा ते डेटिंग करताना दिसले आहेत. क्रिती सेनॉनच्या दिवळी सेलेब्रिशनमध्ये ही जोडी पहिल्यांदा सर्वांच्या नजरेस भरली. त्यानंतर या लव्हबर्ड्सच्या डेटिंगकडे दोघांच्याही चाहत्यांचे लक्ष वेधलं गेलं. या वर्षी जुलैमध्ये या दोघांनी स्पेनमध्ये सुट्टी एकत्र घालवली होती. या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले आणि इटरनेटवर धमाका झाला होता. आता हे जोडपे जोडी चित्रपट निर्माता अमन गिलच्या लग्नाच्या पार्टीत दिसल्यानं प्रेम प्रकरणाच्या चर्चेत भर पडली आहे.

रविवारी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्ढा यांनी लग्नगाठ बांधल्यानंतर उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन साजरे केलं, त्या त्याचवेळी इकडे मुंबईत अमन गिलने त्याच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होतं. या रिसेप्शनला अनेक बी-टाउन सेलिब्रिटीज उपस्थित होते. यामध्ये कथित जोडपे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचाही समावेश होता.

अमन गिलने दिलेल्या रिसेप्शन पार्टीसाठी, अनन्या पांडेने पांढरा ट्यूब ड्रेस निवडला होता आणि यात ती जबरदस्त दिसत होती. तिने फ्रेश मेकअप करून केस मोकळे सोडले होते. तर आदित्य रॉय कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आदित्य आणि अनन्याने उपस्थित पापाराझींना स्वतंत्रपणे फोटोसाठी पोज दिल्या.

कामाच्या आघाडीवर अनन्या पांडे अलिकडेच ड्रीम गर्ल २ मध्ये दिसली होती. ती आगामी अर्जुन वरैन सिंग दिग्दर्शित 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. दरम्यान, आदित्य रॉय कपूर अलिकडेच गुमराह चित्रपटामध्ये दुहेरी व्यक्तिरेखा साकारताना दिसला होता. सध्या तो सारा अली खानसोबत 'मेट्रो इन दिनो'चे शूटिंग करत आहे.

हेही वाचा -

१. Raghav Parineeti Wedding: परिणीती चोप्रा, राघव चड्ढा विवाहबद्ध! जाणून घ्या, त्यांचा आजचा रोमँटिक प्रवास

२. Ragneeti Weeding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा-आप नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले, चाहत्यांना फोटोची प्रतिक्षा

३. Ragneeti Wedding : लग्नसोहळ्यातील परिणीती-राघवचा पहिला फोटो आला समोर; शेअर करताच केले डिलीट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.