ETV Bharat / entertainment

'Rocky Aur Rani..' Twitter review: 'रॉकी और रानी...' ट्विटर रिव्ह्यूमध्ये विभागले रणवीर आलियाचे चाहते - रॉकी और रानी की प्रेम कहानी रिव्ह्यू

करण जोहर दिग्दर्शित लव्ह स्टोरी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. पहिल्या दिवशी पहिला शो पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सनी ट्विटर रिव्ह्यू दिला आहे. अनेकांना हा सिनेमा मनोरंजक वाटलाय तर काहींना खटकला आहे. वाचा वेगवेगळे प्रेक्षक काय म्हणत आहेत.

'Rocky Aur Rani..' Twitter review
'रॉकी और रानी की प्रेम कहानी
author img

By

Published : Jul 28, 2023, 1:41 PM IST

मुबंई - रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सहा वर्षाच्या दीर्घ विश्रांती नंतर करण जोहर पुन्हा एकदा एक फॅमिली एंटरटेनर चित्रपट घेऊन दिग्दर्शनात परतला आहे. या चित्रपटाची हॉलिवूड फिल्म्ससह साऊथ स्टार पवन कल्याणच्या ब्रो या चित्रपटाशीही टक्कर होणार आहे. रणवीर आणि आलियाच्या या चित्रपटाची मात्र जोरदार हवा निर्माण झाली आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर चाहते थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास उत्साहित आहेत. अनेकांनी चित्रपट पाहून ट्विटरवर आपला रिव्ह्यूदेखील दिला आहे. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही हे पब्लिक रिव्ह्यू वाचून तुमचा निर्णय करु शकता. ट्विटरवर एका युजरने लिहिलंय की, 'या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.' दुसऱ्या एकाने म्हटलंय की, 'हासू आणि आसू या दोन्हींच्यामध्ये हा चित्रपट आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या निर्मात्यांनी आपल्यासाठी एक इमोशनल कोलरकोस्टर आणली आहे. खूपच छान.'

आणखी एका युजरने चित्रपटाचे कौतुक करताना लिहिलंय, 'रणवीर आणि आलिया भट्ट यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री एकाद्या जादु प्रमाणे आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट एक व्हज्यअल ट्रीट आहे. पाहायला विसरू नका.' असे असले तरी काहींनी हा सिनेमा आवडला नसल्याचेही लिहिले आहे. ' 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चित्रपट बकवास आहे. आलिया भट्ट ओव्हर अ‍ॅक्टींग करतान दिसते आणि रणवीर सिंगबद्दल तर काय बोलावे. हा फाफट पसारा पाहण्यासाठी तुमचा वेळ आणि पैसा खर्च करु नका,' असे म्हणत त्याने ५ पैकी १ रोटिंग दिले आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात आलिया भट्ट बंगाली मुलगी असून रणवीर सिंगने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. दोघे प्रेमात पडतात पण त्यांचे कुटुंबीय त्यांना विरोध करतात. दोघेही एकमेकांची माणसे, नाती आणि संस्कृती नीट समजून घेण्यासाठी एक दुसऱ्याच्या घरात राहायला जातात.

या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गली बॉय चित्रपटानंतर रवणीर सिंग आणि आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा -

१. Hrithik Roshan And Saba Azad : सबा आझादने हृतिक रोशनसोबत घालवला चांगला वेळ ; सोशल मीडियावर फोटो शेअर

२. Ankush Release Date : केतकी माटेगावकर आणि मंगेश देसाई नव्या धमाक्यासाठी सज्ज, 'अंकुश' रिलीज तारखेची घोषणा

३. Rarkpk Movie : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट रूपेरी पडद्यावर आज होणार प्रदर्शित....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.