ETV Bharat / entertainment

RARKPK Box Office Collection Day 4 : रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चौथ्या दिवशी ५० कोटींचा टप्पा केला पार... - Rocky Aur Rani Kii Prem Kahaani

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी ५० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा.

RARKPK Box Office Collection Day 4
रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४
author img

By

Published : Aug 1, 2023, 2:03 PM IST

मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाला रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूप फायदा मिळत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने सुरुवातीच्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र सोमवारी या चित्रपटाला थोडा कमी प्रतिसाद मिळाला. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ११.१० कोटी कमवले. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. हा चित्रपट सध्या रूपेरी पडद्यावर तुफान कमाई करत आहे.

  • 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची सुरुवात कशी झाली? :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी सुमारे ४५% वाढ झाली. या चित्रपटाने शनिवारी १६.५ कोटींचा व्यवसाय केला. यासह 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने अवघ्या दोन दिवसांत देशभरात २७.१५ कोटींचा व्यवसाय केला.
  • ओपनिंग वीकेंडला किती कोटींची कमाई झाली? : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या रविवारच्या कमाईबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने रविवारी पुन्हा एकदा वेग वाढवला. या दिवशी चित्रपटाने १८.७५ कोटींचा गल्ला जमवला. दुसरीकडे, चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला एकूण 52.92 कोटींची कमाई केली.

चित्रपटाने सोमवारची किती केली कमाई : या आठवड्याच्या शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने सोमवारी काही खास कमाई केली नसून कमाईच्या बाबतीत आकडा अपेक्षेएवढा वाढला नाही आहे. सोमवारी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फक्त ७.५० कोटी कमाई केली. यासह, आतापर्यंत एकूण 52.92 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांसारख्या दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २०१९च्या रिलीज झालेल्या 'गली बॉय' नंतर पहिल्यांदा आलिया आणि रणवीर एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा :

  1. Taapsee Pannu Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला चित्रपट फ्लॉप दिल्यानंतरही तापसी पन्नूने कमविले नाव....
  2. Mrunal Thakur Birthday : छोट्या पडद्यापासून सुरुवात केल्यानंतरही मृणाल ठाकूर गाजवत आहे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत राज्य....
  3. Nora Fatehi : नोरा फेतहीने उलगडली बॉलिवूडची काळी बाजू, मिळाले होते अजब सल्ले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.