ETV Bharat / entertainment

Ved in 50 crore club : वेड चित्रपट ५० कोटी क्लबच्या सीमारेषेवर, पठाण रिलीजपर्यंत सुरु राहणार घोडदौड - Ritesh Deshmukh latest news

अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शकिय पदार्पण असलेल्या वेड चित्रपटाने कमाईचा आकडा सतत चढता ठेवला आहे. लवकरच हा चित्रपट पन्नास कोडींचा आकडा पार करेल. चित्रपटाच्या एकूण कमाईचे लेटेस्ट आकडे पाहण्यासाठी बातमी वाचा.

वेड चित्रपट ५० कोटी क्लबच्या सीमारेषेवर
वेड चित्रपट ५० कोटी क्लबच्या सीमारेषेवर
author img

By

Published : Jan 16, 2023, 4:58 PM IST

Updated : Jan 17, 2023, 11:53 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट वेडने सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाई सुरु ठेवली आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ६. ८१ कोटींची कमाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या विकडेजमध्ये चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असा आत्मविश्वास ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.

तरण आदर्श यांनी एक ट्विट करुन वेड चित्रपटाच्या कमाईचे लेटेस्ट आकडे सांगितले आहेत. 'मराठी चित्रपट वेडने वीकेंड 3 मध्ये ६. ८१ कोटी इतक्या उत्कृष्ट कमाईचा आकडा गाठला आहे. या आठवड्याच्या दिवसात चित्रपट ₹50 कोटी पार करेल. पठाण चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईपर्यंत वेडची घौडदौड कायम राहू शकेल. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 1.35 कोटी, शनिवारी 2.72 कोटी , रविवारी2.74 कोटी. एकूण: ₹ 47.66 कोटी इतकी कमाई आजवर झाली आहे.,' असे तरण आदर्श यांनी लिहिले आहे.

  • #Marathi film #Ved puts up an EXCELLENT number in Weekend 3 [₹ 6.81 cr]… Will cross ₹ 50 cr on weekdays… Should have a clear, unopposed run till #Pathaan arrives… [Week 3] Fri 1.35 cr, Sat 2.72 cr, Sun 2.74 cr. Total: ₹ 47.66 cr. pic.twitter.com/9YiaSPw3Xp

    — taran adarsh (@taran_adarsh) January 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वेड हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये मोठे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 10 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे व्यापार तज्ञांना आनंद झाला. पहिल्या आठवड्याची कमाई पाहून ट्रेड पंडितांना वाटले की दुसऱ्या वीकेंडलाही त्याची कमाई चांगली होईल, मात्र दुसऱ्या वीकेंडमध्ये वेडने असे आकडे नोंदवले आहेत की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी याआधीच वेड चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडमध्ये नोंदवलेले आकडे शेअर केले आहेत, त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. तरण आदर्शने सांगितले की, वेडने दुसऱ्या वीकेंडमध्ये 12 कोटींचा टप्पा पार करून एक विक्रम केला आहे. वेड चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडची कमाई २.३५ कोटी होता व एकूण कमाई ३५. ७७ कोटी होती.

रितेश देशमुखच्या वेडने 10 व्या दिवशी इतिहास रचला - रविवार दि. ८ जानेवारी दिवशी वेड चित्रपटाच्या रिलीजला १० दिवस पूर्ण झाले होते. या दिवशीची बॉक्स ऑफिस कमाई ५.७० कोटी होती. ही आजवरची मराठी चित्रपटाची १० दिवसाची सर्वाधिक कमाई आहे. यापूर्वी सैराट या चित्रपटाने १० व्या दिवशी ४.६१ कोटींची कमाई केली होती. सैराटचा हा विक्रम रितेशच्या वेडने पहिल्यांदाच मोडला आहे. रितेश देशमुखचा वेड हा पहिला चित्रपट आहे, ज्याने 10 व्या दिवसाच्या कलेक्शनसह सर्व हिट मराठी चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांना मागे टाकले आहे. वेडची ११ व्या दिवसाची कमाई पाहता लवकरच हा सिनेमा ५० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज ट्रेड तज्ज्ञ व्यक्त केला होता. आता या आकड्याच्या जवळ कमाई पोहोचली आहे.

विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत झळकला आहे. 'वेड' चित्रपटातून जेनेलिया डिसूझाही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या जोडीला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

दरम्यान, रितेश नुकताच तमन्ना भाटियासोबत 'प्लॅन ए प्लान बी' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. शशांक घोष दिग्दर्शित, या चित्रपटाचा प्रीमियर केवळ नेटफ्लिक्सवर झाला आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम सोबत आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' मध्ये देखील दिसणार आहे.त्याच्याकडे जेनेलिया डिसूझासोबत 'मिस्टर ममी' हा विनोदी चित्रपट आणि जॉन अब्राहम, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्यासोबत '100%' हा चित्रपटही आहे

हेही वाचा - Adil Khan Marriage With Rakhi : आदिल खानने राखी सावंतसोबत लग्न केल्याचे सांगत, तो गप्पा का होता याचा केला खुलासा

Last Updated : Jan 17, 2023, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.