ETV Bharat / entertainment

पूजा हेगडेला दुबईत जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याची बातमी निराधार - पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकीचे वृत्त निराधार

Pooja Hegde dubai event controevrsy : दुबईतील एका कार्यक्रमानंतर अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याचा दावा करणारी बातमी बुधवारी प्रसारित झाली होती. ही बातमी निराधार असल्याचं तिच्या टीमनं सांगितलं आहे. पूजानंही या बातमीवर मौन बाळगले आहे.

Pooja Hegde dubai event controevrsy
पूजा हेगडेला धमक्या मिळाल्याची बातमी निराधार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 4:32 PM IST

मुंबई - Pooja Hegde dubai event controevrsy : दुबईतील एका क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर वाद झाल्यामुळे अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा करण्यात आला होता. ही बातमी बुधवारी इंटरनेटवर झळकल्यानंतर अभिनेत्री पूजा हेगडेच्या चाहत्यांना धक्का बसला. ही अविश्वसनीय बातमी पाहून चाहते धास्तावले आणि तिच्या सोशल मीडियावर अपडेट्स पाहू लागले. परंतु कोणत्याही प्रकारे पूजाकडून निवेदन प्रसिद्ध झालेलं नाही.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पापाराझी विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर दुबईत हा गोंधळ कसा घडला याबद्दलची पोस्ट शेअर केली होती. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर कथित धमक्यांचे तपशीलवार वर्णन केले होते आणि दावा केला होता की वादाच्या दरम्यान अभिनेत्री आता भारतात परतली आहे. विरल भयानी यांनी शेअर केलेल्या विधानानुसार, दुबईत क्लबच्या उद्घाटनाला उपस्थित असताना पूजा हेगडेचा जोरदार वाद झाला, परिणामी तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या.

असं असले तरी वेबलॉइडने संपर्क साधला असता पूजाच्या टीमच्या प्रतिनिधीने या दाव्यांचे खंडन केले, "आम्हाला या खोट्या माहितीचा उगम कुठून झाला याबद्दल काहीच माहिती नाही. ती बातमी पूर्णपणे निराधार आहे," असा निर्वाळा त्यांनी दिला. आत्तापर्यंत पूजाने या प्रकरणाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. दरम्यान, विरल भयानीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही पोस्ट डिलीटही केली आहे.

वर्क फ्रंटवर, पूजा हेगडे या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसली होती. आगामी 'देवा' हा चित्रपट तिच्या हातात आहे. यात ती शाहिद कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार असून हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज करत असून सिद्धार्थ रॉय कपूर आणि झी स्टुडिओजन याची निर्मिती करत आहे. पुढील वर्षी 11 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

'देवा' व्यतिरिक्त, अभिनेत्री 'हाऊसफुल 5' मध्ये देखील दिसणार आहे. हा हाऊसफुल फ्रेंचायझीचा पाचवा भाग, ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, क्रिती सॅनन, क्रिती खरबंदा, जॅकलीन फर्नांडिस, जॅकलीन फर्नांडिस या कलाकारांचा समावेश आहे. दिशा पटानी आणि चंकी पांडे प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

1. एमी-विजेता अभिनेता आंद्रे ब्राउगर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन

2. 'बिग बॉस 17'मध्ये मुनावर फारुकीची स्टँड-अप कॉमेडी, स्पर्धकांना पटवण्यात दाखवली हुशारी

3. ऑस्कर विजेती गुनीत मोंगाने पती सनी कपूरसोबत साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.