ETV Bharat / entertainment

Rekha Birthday : सदाबहार 'खूबसूरत' रेखाचा रिल आणि रियल लाईफमधला खडतर प्रवास

Rekha Birthday : हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सदाबहार अभिनेत्री रेखा आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. बालपणापासूनच कॅमेऱ्यासमोर काम करणाऱ्या रेखाला आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागलाय. आपलं सौंदर्य, अभिनय, नृत्य आणि गायन प्रतिभेच्या जोरावर तिनं अनेक दशकं प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य गाजवलंय. वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकू या.

Rekha Birthday
सदाबहार 'खूबसूरत' रेखा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 10:41 AM IST

Updated : Oct 10, 2023, 1:13 PM IST

मुंबई - Rekha Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा आज 10 ऑक्टोबर रोजी आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही ती इतर अभिनेत्रींना लाजवेल इतकी फिट आणि सुंदर आहे. तिच्या एनर्जी आणि सौंदर्याची चर्चा नेहमीच कलाविश्वात होत असते. विविध पुरस्कार सोहळ्यातही ती आपल्या सौंदर्यांनं सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. खरंतर, बालपणातच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखाला हिंदीचा कोणताही लवलेश नसतानाही ती हिंदी सिनेमाची तीन दशकं आघाडीची अभिनेत्री म्हणून रुपेरी पडदा गाजवत राहिली. आज तिच्या 69 वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकू या.

Rekha Birthday
सदाबहार 'खूबसूरत' रेखा

रेखा ही सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे. तिची आई पुष्पावल्ली यादेखील तेलुगू अभिनेत्री होत्या. त्यामुळे तिला अभिनयाचा मोठा वारसा घरातूनच मिळाला. असं असलं तरी अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. रिल आणि रियल लाईफमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना तिला करावा लागला. तिच्या वाट्याला काही चांगल्या भूमिका निश्चित आल्या असल्या तरी तिला काही 'बी ग्रेड' चित्रपटातूनही काम करावं लागलं होतं. 'सावन भादो' हा तिचा हिंदीतील पदार्पणाचा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर हिंदी चित्रपट निर्मात्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पण तिला बोल्ड सिनेमांची ऑफर देण्यात आल्या. 'प्राण जाये पर वचन न जाये' हा चित्रपटही त्यापैकीच एक होता. यात तिच्या वाट्य़ाला बोल्ड भूमिका आली होती. त्या काळात बोल्ड सीन्सची मोठी मागणी असायची. यामुळे रेखाला अनेक विचित्र अनुभवांचाही सामना करावा लागला. 'अंजाना सफर' या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. यामध्ये एक रोमँटिक गाणं होतं. यातील सीनबद्दल तिला पूर्व कल्पना दिली गेली नव्हती. दिग्दर्शकानं जेव्हा अ‍ॅक्शन म्हटलं तेव्हा नायक असलेल्या विश्वजीतनं तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करायला सुरुवात केली. रेखाला आपल्यासोबत काय घडतंय, हे समजलंच नाही. मात्र, जेव्हा तिला या सीनबद्दल समजलं, तेव्हा ती सेटवरच रडायला लागली. रेखावर लिहिण्यात आलेल्या 'रेखा - द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे.

Rekha Birthday
सदाबहार 'खूबसूरत' रेखा

रेखा ही जेमिनी गणेशन यांची मुलगी असली तरी तिला अनेक वर्ष औरस अपत्याचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे रेखाची सुरुवातीच्या काळात घरची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. त्यामुळे अगदी कमी वयात तिनं चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली. त्याकाळात तामिळ भाषेतील काही 'बी ग्रेड' चित्रपटात रेखानं भूमिका साकारल्या. मात्र तिच्यात एक प्रतिभावान अभिनेत्री दडली आहे, हे पारखी दिग्दर्शकांना माहिती होतं. मुझफर अली या दिग्दर्शकांनं तिला 'उमराव जान' चित्रपटात भूमिका कारण्याची संधी दिली आणि त्याचं रेखानं सोनं केलं. 1981 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. या चित्रपटासाठी रेखानं खास उर्दू भाषेचे धडे गिरवले आणि भाषा आत्मसात केली. रेखा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिकाही आहे. ‘खूबसूरत’ या तिच्या चित्रपटासाठी तिनं दोन गाणीही गायली होती.

Rekha Birthday
सदाबहार 'खूबसूरत' रेखा

रेखा स्वकर्तृत्वावर, अभिनयबळावर नावारुपाला आलेली अभिनेत्री आहे. पण चित्रपटसृष्टीत तिच्या दमदार अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच अधिक बोललं गेलं. तिने स्वतःचं आयुष्य संपवण्याचे केलेले प्रयत्न, तिची अयश्ववी अफेअर्स, तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू आणि इतरही अनेक वाईट घटनांसाठी तिलाच जबाबदार गेलं. चित्रपटसृष्टीतली ही 'मॅडम एक्स' कायम मिस्ट्री वुमन म्हणून जगत राहिली. नंतर तर तिनेच सार्वजनिक जीवनात कमी वावर ठेवत स्वतःची ही ओळख अगदी ठरवून कायम ठेवली. आज रेखा 69 वर्षांची झालीय. पण तिचा एकूण प्रसन्न वावर पाहता 'एज इज जस्ट अ नंबर' ही ओळ तिच्या व्यक्तिमत्त्वाला फिट्ट बसते. रेखानं आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. सत्तरीकडे झुकल्यानंतरही तिच्या खूबसूरतीमध्ये बिल्कुल फरक पडलेला नाही. अगदी तारुण्यापासून तिच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

Rekha Birthday
सदाबहार 'खूबसूरत' रेखा

रेखानं चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर भूमिका केल्या आहेत. तिची आणि अमिताभ बच्चन यांची जोडी सर्वाधिक हिट समजली जाते. दोघांची 'ऑन स्क्रिन' केमेस्ट्री लाजवाब ठरली होती. काही काळ तिच्या आणि अमिताभच्या प्रेम प्रकरणाचीही जोरदार चर्चा सुरू होती. रेखा आजही मांगमध्ये सिंदूर भरत असते. हे कुंकू ती बच्चनच्या नावानं लावते अशा अफवा पसरल्या होत्या, एकदा तिनंच पुढं होऊन याचा खुलासा केला होता. ती कोणाच्याही नावावर सिंदूर लावत नाही तर फॅशन म्हणून लावते, असं तिनं स्वतः सांगून हा वाद शमवला होता.

हेही वाचा -

1. Ekta Kapoor : एकता कपूरला 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटासाठी अनेकांनी केलं ट्रोल....

2. Vidya Balan Breaks Silence : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्या बालनने 'मुलगी' असल्याच्या दाव्यावर सोडले मौन

3. Ankita Lokhande And Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन 'बिग बॉस 17'मध्ये जाणार ?

Last Updated : Oct 10, 2023, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.