ETV Bharat / entertainment

Raveena Tandon Padma Shri : रवीना टंडनने राजामौलीसोबत दिली पोज, पाहा रवीना व कीरवाणींचे संस्मरणीय फोटो - Rashtrapati Bhavan

'KGF 2' अभिनेत्री रवीना टंडनला बुधवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीनाने या संस्मरणीय दिवसाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Etv Bharat
पाहा रवीना व कीरवाणींचे संस्मरणीय फोटो
author img

By

Published : Apr 6, 2023, 10:56 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावाणी, तबला वादक झाकीर हुसेन आणि गायिका वाणी जयराम यांना बुधवारी नवी दिल्लीत 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी 106 लोकांना चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले, त्यापैकी चार मनोरंजन उद्योगाशी संबंधित होते. रवीना आणि कीरवाणी हे दोघेही या सन्मानासाठी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. रवीनाने हा खास क्षण तिच्या इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'RRR' दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासह तिची मुले आणि पती अनिल थडानी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे.

रवीनाचे पद्मश्री सोहळ्यातील फोटो - रवीनाने तिच्या इंस्टाग्रामवर या संस्मरणीय दिवसाची अनेक सुंदर छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात 'पद्मश्री 23, प्रेम आणि उत्सवाचा दिवस' असे कॅप्शन दिले आहे. पहिल्या काही फोटोमध्ये, रवीना टंडन तिच्या कुटुंबासोबत राष्ट्रपती भवनात पोज देत आहे. त्याच वेळी, एका फोटोत ती 'RRR' दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासह तिची मुले आणि पती अनिल थडानी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. शेवटच्या दोन फोटोंमध्ये, अभिनेत्री रवीना राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार घेताना दिसत आहे.

रवीनाला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - रवीनाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे, 'शेवटी, पद्मश्रीसाठी रवीना टंडन मॅडमचे खूप अभिनंदन'. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तुमच्यासाठी आणि आम्हा सर्व चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.' रवीनाने पत्थर के फुल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ९० च्या दशकातील ती आघाडीची अभिनेत्री बनली होती. अनेक फिल्म पुरस्कार मिळवलेल्या रवीनाला पद्मश्री मिळाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

रवीना टंडनची वर्कफ्रंट - रवीना टंडनची वर्क फ्रंट 'KGF 2' अभिनेत्री पुढे रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'घुडचडी' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये संजय दत्त, पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यांच्या पाइपलाइनमध्ये 'पटना शुक्ल' देखील आहे.

हेही वाचा - Hrithik Roshan Saba Azaddinner Date : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत डिनर डेट, लग्नाच्या चर्चेला पुन्हा उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.