मुंबई - Rashmika Mandanna trolled : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना एकाचवेळी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असते. त्यामुळे तिला सतत प्रवास करावा लागतो. तिचा वावर देशा विदाशातही असतो. विमानतळावर जे सेलेब्रिटी दिसतात त्यांच्या एअरपोर्ट लूकची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. तिथे तैनात असलेला पापाराझींकडून त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल केले जातात. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने अलिकडे केलेल्या प्रवासा दरम्यान परिधान केलेल्या ड्रेसमुळे नेटिझन्स तिला ट्रोल करत आहेत.
इंस्टाग्रामवर पापाराझो अकाऊंटद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, रश्मिका विमानतळातून बाहेर पडण्यापूर्वी कॅमेराकडे हसत पोज देताना दिसत आहे. तिने इतर कॅमेऱ्यांकडेही हात दाखवत पोज दिली. तिने या प्रवासाच्यावेळी निळी फाटलेली जीन्स आणि काळ्या चप्पलसह पांढरा हुडी परिधान करुन आपला लूक सिंपल ठेवला होता. तिने मेकअपलाही सुट्टी दिली होती आणि केस मोकळे सोडले होते. तिने काळा सनग्लासेस घातला होता आणि बॅगही सोबत घेतली होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर ड्रॉप होताच युजर्सनी कमेंट विभागात गर्दी केली आणि तिच्या विमानतळावरील लूकबद्दल त्यांचे विचार मांडण्यास सुरुवात केली. काही युजर्सनी तिच्या ड्रेस सेन्सची तिची खिल्ली उडवली आणि तिच्याबद्दल वाईट कमेंट्सही केल्या. एका यूजरने लिहिले की, किती अजब फॅशन येते राव. दुसऱ्यानं कमेंटमध्ये तिनं छपरी जीन्स घातल्याचं सांगितलं. काहींना मात्र तिचा हा साधा लूक आवडला व तिच्या कौतुकाचे इमोजी टाकले.
कामाच्या आघाडीवर रश्मिका मंदान्ना बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत आगामी 'अॅनिमल' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा गँगस्टर-अॅक्शन थ्रिलर चित्रपट यंदा 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या आगामी पुष्पा 2: द रुलमध्ये देखील दिसणार आहे. यात ती पुन्हा एकदा श्रीवल्लीची भूमिका साकारताना दिसेल.
हेही वाचा -
१. Sara Ali Visited Kartiks Home : कार्तिक आर्यनच्या घरी सारा अली खान, तर्क वितर्कांना उत