ETV Bharat / entertainment

Rashmika Mandanna : मॉर्फ व्हिडिओवर रश्मिका म्हणाली, तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक - तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक

Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिनं भीती व्यक्त केली आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 6:36 PM IST

Updated : Nov 29, 2023, 12:46 PM IST

मुंबई Rashmika Mandanna : साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एकामागून एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये पोहोचलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आली आहे. तिचा नुकताच सोशल मीडियावर एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळं ती सध्या खूप अस्वस्थ झाली आहे. रश्मिकानं याप्रकरणी तिची प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी देखील सुशांत सिंग राजपूतचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की, या व्हिडिओत रश्मिका आहे. मात्र त्यानंतर खरा व्हिडिओ समोर आला.

रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल : रश्मिका मंदान्नानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, 'हा व्हिडीओ केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळं आज लोकांचं खूप नुकसान होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ ब्रिटिश-भारतीय महिलेचा आहे, जी लिफ्टच्या आत काळे कपडे घातलेली आहे. या महिलेचा चेहरा रश्मिकासारखा दिसण्यासाठी एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनावटी व्हिडिओ तयार केला. रश्मिकाचा व्हिडिओ इतका खरा वाटत आहे की, अनेकांना आधी हा व्हिडिओ खरा वाटला होता. त्यानंतर काही यूजर्सनं तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना ही काळ्या रंगाच्या डीपनेक जंपसूटमध्ये लिफ्टच्या दरवाजातून बाहेर येत असल्याचं दिसत होती. त्यानंतर खरा व्हिडिओ एक्स हँडलवर समोर आला. खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडिओ शेअर करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

डीपफेक व्हिडिओवर रश्मिका मंदान्नाची पोस्ट : रश्मिका मंदान्नानं सांगितलं की, 'आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझं कुटुंब, मित्र आणि चाहत्यांची आभारी आहे जे माझे संरक्षण आणि समर्थन करत आहेत. जर मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत हे घडलं असतं तर मी ते कसं हाताळलं असतं याची कल्पना मी करू शकत नाही. 'आमच्यापैकी अधिक लोकांना अशा घटनेचा त्रास होण्याआधी एक समाज म्हणून आपण त्वरित याकडे लक्ष देणं आवश्यक आहे'. तिच्या ट्विटमध्ये, रश्मिकानं सायबराबाद पोलीस, महाराष्ट्र सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी नोडल एजन्सी यांच्या अधिकृत हँडलला ही पोस्ट टॅग केली आहे.

हेही वाचा :

  1. KH 234: कमल हसन आणि दुलकर सलमानचं 'केएच 234' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज
  2. Tara Sutaria : तारा सुतारियानं एक आठवडा टाळली होती आंघोळ, 'अपूर्वा'साठी अनोखं समर्पण
  3. Rashmika Mandanna Fake Video Viral : रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल, बिग बींनी केली कारवाईची मागणी

Last Updated : Nov 29, 2023, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.