मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रश्मिका मंदान्नाच्या हसण्याची जादू सर्वत्र पसरली आहे. अभिनेत्रीच्या फॅन फॉलोइंगची लाईन खूप मोठी आहे. आता रश्मिका बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. साऊथमध्ये रश्मिकाने आपली जादू दाखवली असून आता ती 7 ऑक्टोबरपासून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल होणार आहे. दरम्यान, ती तिच्या डेब्यू बॉलीवूड चित्रपट गुडबायच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जिथे तिने एका फॅनला चकित करुन सोडले.
खरंतर एका चाहत्याच्या विनंतीवरून रश्मिकाने त्याच्या टी-शर्टवर हृदयाचा ऑटोग्राफ केला आणि त्याचा आनंद शिगेला पोहोचला. रश्मिकाने आपल्या चाहत्यासाठी आनंद बहाल केला. यावेळी रश्मिका हलक्या हिरव्या रंगाच्या वनपीस ड्रेसमध्ये वावरताना दिसली.
चाहत्यांनी केले कौतुक - जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा रश्मिकाचे चाहते हा मुलगा किती भाग्यवान आहे यावर कमेंट करत आहेत. त्याचवेळी काही चाहत्यांनी रश्मिकाच्या या स्टाइलचे खुलेपणाने कौतुकही केले.
बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटचे अमिताभ बच्चन आणि साऊथ फिल्म्सची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा पहिला हिंदी चित्रपट 'गुडबाय' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते.
रश्मिकाचा बॉलिवूड डेब्यू - रश्मिका मंदान्नाने इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर शेअर केले आणि त्याला एक सुंदर कॅप्शन दिले आणि लिहिले, 'पापा आणि मी 7 ऑक्टोबरला तुमच्या कुटुंबाला भेटायला येत आहोत'. गुडबाय हा चित्रपट पुढच्या महिन्यात ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
रश्मिका मंदन्नाकडे तीन बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात गुडबाय तसेच टायगर श्रॉफसोबत 'स्क्रू ढीला' आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' यांचा समावेश आहे. गुडबायची रिलीज डेट जाहीर झाली असली तरी इतर दोन चित्रपटांची रिलीज डेट अजून यायची आहे.
हेही वाचा - Goodbye trailer: रश्मिका मंदान्नाच्या बॉलीवूड पदार्पण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज