ETV Bharat / entertainment

अरुण बालींच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा,नीना गुप्ताने केला 'गुडबाय' - रश्मिका मंदान्ना अरुण बाली

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता हिने 'गुडबाय' चित्रपटाचा सहकलाकार अरुण बाली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अरुण बालींच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा

author img

By

Published : Oct 7, 2022, 4:00 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते. अरुण यांचे चाहते आणि सेलेब्स त्यांच्या निधनाने शोकाकुल झाले असून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अरुण बालींच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला त्यांचा शेवटचा चित्रपट 'गुडबाय' रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असून अभिनेत्रीने अरुण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'गुडबाय' को-अभिनेता अरुण बाली यांच्या निधनावर रश्मिका मंदान्नाने एक पोस्ट शेअर करत लिहिले, 'Really very sad'.

नीना गुप्ता यांनी व्यक्त केले दु:ख - त्याचवेळी गुडबाय चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सहकलाकार अरुण बाली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नीनाने अरुण यांच्या मृत्यूची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ''गुडबाय अरुण बाली, अनेक वर्षांपूर्वी अरुण बालीसोबत मालिका परंपरेतील माझे पहिले शूट, गुडबायमध्ये त्यांच्यासोबत काम करताना अनेक चांगले क्षण घालवले."

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा शोक संदेश
अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा शोक संदेश

बाली यांचा मुलगा अंकुश याने सांगितले की, त्याचे वडील 'मायस्थेनिया ग्रॅव्हिस' या आजाराने ग्रस्त होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अंकुशच्या म्हणण्यानुसार, उपचाराचा परिणाम त्याच्या वडिलांवर दिसत होता, मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. नसा आणि स्नायू यांच्यातील संवादाच्या बिघाडामुळे हा आजार होतो. अरुण बाली यांच्या निधनाने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना चाहते करत आहेत

90 च्या दशकात सुरू झाली करिअर - अरुण बाली यांनी प्रसिद्ध फिल्ममेकर लेख टंडनच्या टीव्ही शो 'दूसरा केवल'मधून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये शाहरुख खानही दिसला होता. 'चाणक्य', 'स्वाभिमान', 'देस में निकला होगा चांद', 'कुमकुम-एक प्यारा सा बंधन' यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. बाली 'सौगंध', 'राजू बन गया जेंटलमन', 'खलनायक', 'सत्या', 'हे राम', 'लगे रहो मुन्ना भाई', '3 इडियट्स', 'रेडी', 'बर्फी', 'मनमर्जियां', ' 'केदारनाथ', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'लाल सिंह चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसले होते.

त्यांचा शेवटचा चित्रपट 'गुडबाय' या शुक्रवारी म्हणजेच आजच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बालीच्या कुटुंबात त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.