ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'च्या सक्सेस पार्टीमध्ये रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी दिसल्या एकत्र - संदीप रेड्डी

Animal Success Party: 'अ‍ॅनिमल'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 550 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं यश पाहून निर्मात्यांनी 6 जानेवारीला एका पार्टीचे आयोजन केलं होतं, ज्यामध्ये 'अ‍ॅनिमल'ची संपूर्ण टीम एकत्र दिसली होती.

Animal Success Party
अ‍ॅनिमल सक्सेस पार्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 6:39 PM IST

मुंबई - Animal Success Party : संदीप रेड्डी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट वर्षी 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची टक्कर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी झाली. दरम्यान 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटानं अनेक चित्रपटांचे विक्रम देखील मोडले आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याचं दिवशी 63.8 कोटीची कमाई केली. चित्रपटाच्या अफाट यशाच्या एका महिन्यानंतर, निर्मात्यांनी 6 जानेवारी रोजी टीमसाठी सक्सेस पार्टीचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. 'अ‍ॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत 'गीतांजली' आणि 'जोया' या दोन्ही भाभी एकत्र दिल्या.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची सक्सेस पार्टी : 'अ‍ॅनिमल' सक्सेस पार्टीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिला रेड कार्पेटवर चालताना दिसत आहे. यादरम्यान रणबीर कपूरसोबत त्याची पत्नी आलिया भट्ट दिसत आहे. या पार्टीमध्ये रश्मिका आणि तृप्ती हसताना आणि मिठी मारताना दिसल्या. याशिवाय अनिल कपूर आणि बॉबी देओल हा रश्मिकासोबत यावेळी बोलताना दिसले. रश्मिकानं ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यानंतर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या टीमनं ग्रुप फोटोसाठी स्टेजवर एकत्र पोझ दिली. रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि आलियाचे वडील महेश भट्ट देखील या पार्टीत हजर होते.

'अ‍ॅनिमल' चित्रपटानं केलं इतक्या कोटीचं कलेक्शन: 'अ‍ॅनिमल' सक्सेस पार्टीसाठी निर्मात्यांनी ब्लॅक थीम ठेवली होती. पार्टीत पोहोचलेले जवळपास सर्व कलाकार काळ्या कपड्यात दिसले. रणबीर कपूरनं या पार्टीमध्ये आलिया भट्टसोबत फोटोसाठी पोझ दिली. या जोडप्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. याशिवाय रणबीरनं पत्नी आलिया आई नीतू आणि सासरे महेश भट्ट यांच्यासोबत अनेक फोटो काढले. 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं जगभरात 898.65 कोटीचा व्यवसाय केला आहे. रणबीर कपूरच्या करिअरमधील हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणार ठरला आहे. हा चित्रपट आता देखील बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. आयरा खाननं भाऊ जुनैद खानसोबत शेअर केला फोटो
  2. जयपूर पिंक पँथर्सला चिअर करण्यासाठी पोहचले बच्चन कुटुंब
  3. करण सिंग ग्रोव्हरनं बिपाशा बसूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेअर केली पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.