ETV Bharat / entertainment

लालबागच्या राजाच्या दर्शनाला रश्मिका मंदान्ना आणि अजय देवगणसह अनेक सेलेब्रिटींची हजेरी - Lalbaghcha Raja darshan

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात अनेक सेलेब्रिटींचा दर्शनासाठी ओघ सुरू आहे. गुडबाय या आगामी चित्रपटातून बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झालेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अजय देवगणसह अनेक स्टार्सनी आजा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला रश्मिका मंदान्ना

author img

By

Published : Sep 7, 2022, 1:17 PM IST

मुंबई - 'गुडबाय' या बॉलिवूड चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने मुंबईतील 'लालबागचा राजा दरबार'मध्ये बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाच्या दर्शनासाठी या अभिनेत्रीला प्रचंड संघर्ष करावा लागला. रश्मिका मंदान्नासह अनेक स्टार्सनी येथे भेट दिली. यामध्ये अजय देवगण आपल्या मुलासोबत येथे पोहोचला होता. गणपती उत्सवाचे दिवस सुरू असून लालबागचा राजा दरबार पाहण्यासाठी सेलिब्रिटींची गर्दी होत आहे.

रश्मिका मंदान्ना 'गुडबाय' चित्रपटाची निर्माती एकता कपूरसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती. सुंदर जॅकेट ड्रेसमध्ये रश्मिकाने येथे पोहोचून श्रीगणेशाचे दर्शन घेतले. यापूर्वी रश्मिकाने चाहत्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले होते. त्यावेळी रश्मिकाला पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक दिसत होते.

रश्मिका मंदान्ना, अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता स्टारर 'गुडबाय' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरला भरभरून दाद मिळाली आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

येथे अजय देवगणनेही कडेकोट बंदोबस्तात आपल्या मुलासोबत बाप्पाचे दर्शन घेतले. अजय देवगण इथे निळ्या रंगाचा शर्ट घालून आला होता. यापूर्वी अजय देवगणची पत्नी काजोलनेही बाप्पाचे दर्शन घेतले होते. यादरम्यान काजोल एकटी होती आणि पिवळ्या साडीत येथे पोहोचली होती.

याशिवाय 'धोका-राऊंड द कॉर्नर' चित्रपटाची टीमही बाप्पाच्या दर्शनासाठी येथे आली होती. यामध्ये चित्रपटातील अभिनेत्री खुशाली कुमार, अपारशक्ती खुराना आणि दर्शन कुमार यांनी येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

हेही वाचा - Ponniyin Selvan Trailer: मणिरत्नम यांचा भव्य नेत्रदिपक ऐतिहासिक पोन्नियिन सेल्वनचा ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.