ETV Bharat / entertainment

मुकेश खन्नांच्या 'शक्तिमान' चित्रपटात सुपरहिरोच्या भूमिकेत झळकणार रणवीर सिंग? - शक्मिमान रणवीर सिंग

रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर सिंग आता सुपरहिरो शक्तीमानची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणार असल्याचे वृत्त आहे.

रणवीर सिंग
रणवीर सिंग
author img

By

Published : Jul 6, 2022, 2:45 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता रणवीर सिंग आज (६ जुलै) त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने या अभिनेत्यावर बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडियानुसार, रणवीर कपूरबद्दल असे बोलले जात आहे की, प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'शक्तिमान'वर बनत असलेल्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'शक्तिमान' मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनलच्या सहकार्याने, यावर्षी सुपरहिरो शक्तीमानच्या संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली. या चित्रपटावर काम सुरू झाले असून शक्तीमानसाठी रणवीर सिंगचे नाव पहिल्यांदा आले आहे.

मीडियानुसार, रणवीर सिंगला शक्तीमानच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. रणवीर सिंगनेही या भूमिकेसाठी उत्सुकता दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा व पुष्टी झालेली नाही.

सध्या रणवीर सिंग त्याच्या नवीन चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे. यापूर्वी ही जोडी गली बॉय या हिट चित्रपटात झळकली होती.

रणवीर सिंगचा मागील चित्रपट जयेशभाई जोरदार प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर फारसा यश मिळवू शकला नव्हता. रणवीर सिंग चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणच्या ७व्या सीझनमध्ये दिसणार आहे. येथे तो रॉकी और रानी की प्रेम कहानीची सहअभिनेत्री आलिया भट्टसोबत पोहोचेल. याचा एक प्रोमोही समोर आला आहे.

हेही वाचा - Ranveer Singh B Irthday : करण जोहरने 'रॉकी'ला तर 'एक व्हिलेन'ने दिल्या दुसऱ्या व्हिलेनला शुभेच्छा !!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.