ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग बनला शाहरुखचा शेजारी, 119 कोटी रुपयांत खरेदी केली प्रॉपर्टी? - Ranveer Deepika new house

शाहरुखचा प्रसिध्द मन्नत बंगल्याच्या शेजारी अभिनेता रणवीर सिंगने 119 कोटी किमतीचे समुद्राभिमुख लक्झरी क्वाड्रप्लेक्स विकत घेतले आहे. प्रीमियम प्रॉपर्टीमध्ये एकूण 11,266 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि 1,300 स्क्वेअर फूट एक्सक्लुझिव्ह टेरेस आहे.

रणवीर सिंग बनला शाहरुखचा शेजारी
रणवीर सिंग बनला शाहरुखचा शेजारी
author img

By

Published : Jul 11, 2022, 12:51 PM IST

मुंबई - मुंबईचे वांद्रे हा परिसर आलिशान उंच इमारतींसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. सुपरस्टार शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी याच भागात राहतात. शाहरुखचा प्रसिध्द मन्नत बंगल्याच्या शेजारी अभिनेता रणवीर सिंगने 119 कोटी किमतीचे समुद्राभिमुख लक्झरी क्वाड्रप्लेक्स विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.

रणवीरने घेतलेली ही प्रॉपर्टी टॉवरच्या 16व्या 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर अपार्टमेंट पसरलेली आहे. प्रीमियम प्रॉपर्टीमध्ये एकूण 11,266 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि 1,300 स्क्वेअर फूट एक्सक्लुझिव्ह टेरेस आहे. 2021 मध्ये, रणवीर आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण यांनी अलिबागमध्ये 22 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, रणवीर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' मध्ये दिसणार आहे. 'सिम्बा' नंतर अभिनेता-दिग्दर्शक जोडीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रणवीरकडे करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' देखील आहे. यात आलिया भट्ट, जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्यासोबत आहे.

हेही वाचा - नवविवाहित नयनतारा, विघ्नेश शिवनला भेटली मलायका अरोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.