ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटने इंटरनेटवर भूकंप - Ranveer Singh Nude Photos

रणवीर सिंगने नग्न फोटोशूट केल्याने इंटरनेट ब्रेक होण्याची वेळ आली आहे. पेपर मॅगझिनच्या नव्या अंकासाठी हे फोटोशूट त्याने केले. इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना त्याचे हे फोटो आवडल्याचे दिसत आहे.

रणवीर सिंग पेपर मॅगझिन कव्हरवरील फोटो
रणवीर सिंग पेपर मॅगझिन कव्हरवरील फोटो
author img

By

Published : Jul 22, 2022, 10:21 AM IST

Updated : Jul 22, 2022, 11:51 AM IST

मुंबई - इंटरनेटवर वादळ निर्माण करण्यात रणवीर सिंगला दुसरा स्पर्धक नाही. हे त्याने वेळोवेळी सिध्द केले आहे. इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा, रणवीर हा लैंगिक असमानतेला आव्हान देण्यासाठी वेळोवेळी चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे बोल्ड फॅशन स्टेटमेंट लूक, विचित्र कमेंट्स आणि ओव्हर-द-टॉप एनर्जी ही काही कारणे त्याच्या चाहत्यांना प्रेमात पाडत असतात.

पेपर मॅगझिन कव्हरवरील फोटोसाठी रणवीर सिंगने नग्न फोटोशूट केल्याने इंटरनेट ब्रेक होण्याची वेळ आली आहे. पेपर मॅगझिनच्या नव्या अंकासाठी हे फोटोशूट त्याने केले. इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना त्याचे हे फोटो आवडल्याचे दिसत आहे.

बर्ट रेनॉल्ड्सपासून प्रेरित झालेला रणवीर सिंग तुर्कीच्या गालिच्यावर पोज देताना दिसत आहे, त्याने वाढदिवसाच्या सूटशिवाय काहीही घातलेले नाही. कॅमेर्‍यासाठी वेगवेगळ्या पोझ देताना तो आकर्षक दिसत आहे.

'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने हे फोटो पोस्ट केले आहेत. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील व्यंगात्मक प्रतिक्रिया आहेत.

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, "इंटरनेट खंडित झाले आहे. तर दुसर्‍याने लिहिले, "एफबॉयने भरलेल्या जगात, रणवीरने इफिंग सिंग बनणे निवडले". दुसर्‍या एका चाहत्याने दीपिकाला फोटो ठीक आहे का असे विचारले आणि लिहिले, "वाह..त्याच्या पत्नीने त्याला परवानगी दिली?!"

विशेष म्हणजे पेपर मॅगझिन हेच ​​मॅगझिन आहे ज्याने 2014 मध्ये प्रसिद्ध किम कार्दशियनच्या शॅम्पेन फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

हेही वाचा - 'मेगाबजेट'मध्ये बनणार 'रामायण', रणबीर कपूर 'राम' तर 'रावणा'च्या भूमिकेत ह्रतिक रोशन!!

Last Updated : Jul 22, 2022, 11:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.