मुंबई - अभिनेता रणवीर सिंग याची प्रमुख भूमिका असलेल्या 'सर्कस' चित्रपटाचे शूटिंग अखेर संपले आहे. बुधवारी, रणवीरने इंस्टाग्रामवर त्याच्या चित्रपटाच्या रॅपची घोषणा केली. सर्कस चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.
"शूटिंग खतम, प्रमोशन की प्लॅनिंग शूरू! मास्टर फिल्ममेकर के मास्टर प्लॅन्स !!! ," असे त्याने लिहिले आहे. रणवीरने सेटवरील आनंदी फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये तो रोहित आणि सहकलाकार वरुण शर्मासोबत हसताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्सपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे कथानक जन्मावेळी चुकून विभक्त झालेल्या समान जुळ्या मुलांच्याभोवती फिरते. 'सर्कस'मधून रणवीर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारत आहे.
पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा आणि व्रजेश हिरजी हे देखील 'सर्कस' चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट 23 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे.
हेही वाचा - Happy Birthday Aaradhya : अभिनेता अभिषेक बच्चनने खास अंदाजात मुलगी आराध्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा