ETV Bharat / entertainment

इम्फाळमध्ये रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचा पारंपारिक पद्धतीनं विवाह सोहळा पडला पार - Randeep Hooda

Randeep Hooda Lin Laishram Wedding: अभिनेता रणदीप हुड्डानं लिन लैश्रामबरोबर इम्फाळमध्ये पारंपारिक मेईतेई पद्धतीनं लग्न केलं. या जोडप्याच्या लग्न समारंभातले काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Randeep Hooda Lin Laishram Wedding
रणदीप हुड्डा आणि लिन लैश्रामचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 10:45 AM IST

मुंबई - Randeep Hooda Lin Laishram Wedding: अभिनेता रणदीप हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. इम्फाळमध्ये त्यांनं लिन लैश्रामशी लग्न केले. या लग्नात त्यानं पांढरी धोती कुर्ता सोबत एक विशेष प्रकारचा पगडी घातली होती. रणदीपनं घातलेल्या खास पगडीला मणिपुरी भाषेत 'कोक्यात' म्हणतात. श्वेत रंगाच्या कापडापासून बनवलेल्या पारंपरिक पगडीवर विस्तीर्ण सोनेरी रंगाची गोटपट्टी लावलेली असते. मणिपुरी विवाहसोहळ्यात या पगडीला विशेष महत्त्व असतं. विवाह विधीसाठी वधू लिन लैश्रामनं पोटलोई ड्रेस निवडला. हा सिलेंडरच्या आकाराचा स्कर्ट आहे, जो बांबू आणि जाड कापडापासून बनलेला असतो.

रणदीप हुड्डानं शेअर केली फोटो : या लग्नामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लिन लैश्राम आणि रणदीप एकमेकांना पुष्पहार घालताना दिसत आहेत. रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी इम्फाळमध्ये पारंपारिक मेईतेई पद्धतीनं लग्न केले. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांनी बुधवारी 'इन्स्टाग्राम'वर त्यांच्या प्री वेडिंगमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते. आता त्यांनी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपुरमधील एका रिसॉर्टमध्ये सप्तपदी केली. या जोडप्यानं लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आजपासून आम्ही एक आहोत.' त्याने पोस्ट केलेल्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : या जोडप्याच्या फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, 'रणदीप आणि लिन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा' दुसऱ्या एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, 'लिन आणि रणदीप तुम्ही एकत्र सुंदर दिसत आहेत, अभिनंदन'. आणखी एका लिहिलं, 'छान फोटो आहेत, खूप खूप शुभेच्छा' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. लिन लैश्राम ही अभिनेत्री आणि बिजनेस वुमन आहे. लिननं 'रंगून', 'मेरी कॉम' आणि 'ओम शांती ओम' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिनं 'मटरू की बिजली का मन डोला' या चित्रपटातही एक छोटी भूमिका केली आहे.

हेही वाचा :

  1. 'कांतारा'च्या नावावर आणखी एक पुरस्कार; कन्नड चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास
  2. 'कबीर सिंग'साठी रणवीर सिंगनं दिला होता नकार; संदीप रेड्डी वंगानं केला खुलासा
  3. हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' रिलीज होईल 'या' दिवशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.