मनाली (हिमाचल प्रदेश) - रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला अॅनिमल या चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेशातील मनालीच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये सुरू झाले आहे. शुक्रवारी, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाबद्दल अपडेट शेअर केले. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चित्रपटातील एक सदस्य क्लॅपरबोर्ड हातात धरलेला दिसत आहे.
"रणबीर कपूर - संदीप रेड्डी वंगा: 'अॅनिमल' शूट आज सुरू होत आहे... अर्जुन रेड्डी व कबीर सिंह दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा रणबीर कपूरसोबत पहिलाच चित्रपट. अॅनिमलचे शूटिंग आज मनालीमध्ये सुरू झाले," असे त्यांनी लिहिले आहे.

'अॅनिमल' हा गँगस्टरवर आधारित नाट्यमय चित्रपट नातेसंबंधाच्या सतत बदलत्या स्वरूपाभोवती फिरतो, ज्याच नायक एखाद्या जनावरासारखा बनतो. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित असलेल्या 'अॅनिमल'मध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. हा एक क्राईम ड्रामा आहे आणि पुढील वर्षी 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचा - हनीमून सोडून रश्मिका मंदान्नासोबत रणबीर कपूर करतोय 'अॅनिमल'चे शुटिंग!!