ETV Bharat / entertainment

Animal teaser out : रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टिझर झाला प्रदर्शित...

Animal teaser out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘अ‍ॅनिमल’चा टिझर हा रिलीज झाला आहे. या टिझरमध्ये रणबीर हा अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसत आहे. याशिवाय बॉबी देओल हा वेगळ्याचं अवतारात झळकला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 12:26 PM IST

Animal teaser out
अ‍ॅनिमल’चा टिझर प्रदर्शित

Animal teaser out : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ हा 2023चा बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटामधील रणबीरचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. निर्मात्यांनी 28 सप्टेंबरला म्हणजेच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला 'अ‍ॅनिमल'चा मोस्ट अवेटेड टीझर प्रदर्शित केला आहे. रणबीरच्या चाहत्यांना ही एक निर्मात्यांनी भेट दिली आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर हा खूपच स्फोटक आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती दिमरी हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अ‍ॅनिमल'चा टीझर झाला प्रदर्शित : 'अ‍ॅनिमल'चा टीझर हा 2 मिनिटे आणि 26 सेकंदांचा आहे. 'अ‍ॅनिमल'च्या टिझरमध्ये रणबीर हा जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. टीझरची सुरुवात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे मुलांबद्दल बोलताना दिसतात. त्यानंतर रणबीर आणि रश्मिकामध्ये थोडा वाद होताना दिसतो. तसेच नंतर अनिल कपूर हा रणबीरला मारताना दाखविला आहे. यानंतर रणबीर आणि बाकी काहीजण तोडफोड करताना दाखविल्या गेले आहेत. टीझरच्या शेवटी बॉबी देओल कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसत आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. टीझरमध्‍ये रणबीर कपूरचा हिंसक लूक हा चाहत्यांना खूप आवडत आहे.

'अ‍ॅनिमल' देणार 'या' चित्रपटाला टक्कर : अनिल कपूर 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रश्मिका मंदान्ना रणबीरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. त्यानंतर निर्मात्यांनी रिलीजची तारीख वाढवली. आता हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं हो की, या चित्रपटामध्ये सात गाणी आहेत. जेव्हा पाच गाणी पाच भाषांमध्ये रिलीज होतात तेव्हा 35 गाणी बनतात. असं त्यांनी सांगितलं होतं. 'अ‍ॅनिमल' चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'अ‍ॅनिमल'ला विक्की कौशल स्टारर 'सॅम बहादूर' टक्कर देताना दिसेल.

हेही वाचा :

  1. Ranbir Kapoor birthday : नीतू सिंग आणि रिद्धिमा साहनीने 'राहाचे पापा' रणबीर कपूरला दिल्या 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' - पाहा फोटो
  2. HBD Mouni Roy : दिशा पटानीनं बेस्ट फ्रेंडला मौनी रॉयला दिल्या शुभेच्छा....
  3. Buy One Get One Free Ticket for Jawan: ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'च्या निर्मात्यांनी दिली तिकिटांवर ऑफर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.